वासुदेव समाजातील लोककलावंतना तात्काळ मदत करावी -सुनिल डोईजड     

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या
नांदेड  : वैजनाथ  स्वामी
       राज्यात कोरोनामुळे सरकारने लोकडाऊन केले आहे. यामुळे राज्यातील भटके विमुक्त समाजातील पारंपरिक लोककलावत लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांना पुरेसे अन्यधान्य किराणा व आर्थिक मदत करावी अशी मागणी भटक्या विमुक्त जाती, जमाती सेवा संघाचे अध्यक्ष सुनिल डोईजड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या श्री डोईजड यांनी निवेदनात म्हंटले आहे, ” की कोरोनाविषाणचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरू असलेल्या  लोकडाऊन मुळे सर्वच व्यवसाय-धंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असलेल्या वासुदेव,जोशी गोंधळी नित्यगणा ढोलकी पिंगला वाघ्या मुरळी स्मशाजोगी जोगी डकलवार मदारी बहुरूपी रायरद नाथपंथी व डवरी गोसावी भिल्ल वपारधी  या आदिवासी प्रवगातील निराधार लोकांना बिकट परिस्थिती झाली आहे.
         गेल्या अनेक वर्षांपासून छोटे मोठे कार्यक्रम करून उपजीविका करणाऱ्या या व्यक्तीकडे तुटपुंजी असलेली रसद संपली असून आता त्याची उपासमार होऊ लागली आहे. या महामारीचे संकटं हजारो लोक उपासमार व आर्थिक टंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन या लोकांना रेशन धान्य दुकानावर मोफत धान्य व किराणा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी  सुनील डोईजड यांनी मागणी केली आहे.