मुखेड उपजिल्हा रुग्णालयात 9 वैद्यकिय अधिकारी गैरहजर तहसिल प्रशासनाने केला पंचनामा; सोमवारी पालकमंत्री यांनी दिली होती भेट पालकमंत्र्याच्याही आदेशाला केराची टोपली

ठळक घडामोडी महाराष्ट्र

मुखेड : संदीप  पिल्लेवाड

मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचा दि. 14 रोजी तहसिल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात 9 वैद्यकिय अधिकारी गैरहजर आढळुन आले असुन दि. 13 रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच भेट देऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत खडेबोल सुनावले होते.

मुखेड उपजिल्हा रुग्णालयात मुखेडसह, देगलुर,नायगांव व बिलोली या चार तालुक्यातील कोरोना रुणांची तपासणी व उपचार येथे होणार असुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील संपुर्ण प्रशासनाची बैठक घेतली असता यात उपजिल्हा रुग्णालयाच्या तक्रारी सर्वाधिक होत्या. यामुळे स्वत: पालकमंत्री यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली व येथील वैद्यकिय अधिकाऱ्यांना आरोग्यविषयक योग्य काम करण्याच्या सुचनाही दिल्या पण या आदेशाला सुध्दा केराची टोपली देत उपजिल्हा रुग्णालयातील 9 वैद्यकिय अधिकारी गैरहजर राहत केवळ 2 वैद्यकिय अधिकारी उपस्थित असल्याचे हजेरी रजिस्टवर आढळुन आले.

मुखेड उपजिल्हा रुग्णालयाच्या वारंवार तक्रारी प्राप्त होतात. येथील अनेक वैद्यकिय अधिकारी मुखेड येथे न राहता नांदेड अथवा इतर शहरातून ये-जा करतात. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याच अनेक कामे सांगुन चालढकल करीत असतात याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ महाले यांनी सुध्दा बैठक घेतली तर स्थानिक आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सुध्दा वारंवार उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनासक्त ताकीद देऊनही गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होत नाही.

सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर डोईजड यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट दिली असता अनेक कर्मचारी गैरहजर आढळले त्यामुळे तहसिलदार यांना डोईजड यांनी संपर्क केला आणि तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी याची तात्काळ दखल घेत तलाठी बि.आर. बोरसुरे यांनी पंचनामा करण्यास सांगितला . या पंचनाम्यात डॉ. पी.आर. नुन्नेवार हे केवळ एकच डॉक्टर उपस्थित होते तर वैद्यकिय अधिक्षक ए.एम.पाटील,डॉ. एस.एस.तहाडे,डॉ. जी.बि. शिंदे, डॉ. बि.एस. बिडवे, डॉ. एस.के. टांकसाळे, डॉ. एस.एस.देवकत्ते, डॉ. ए.जी. पवार, डॉ. एस.वी. कांकांडीकर, डॉ. यु.आर. गायकवाड है गैरहजर आढळुन आले आहेत. या पंचनाम्यावर ज्ञानेश्वर डोईजड, डॉ. रंजित काळे, पवन जगडमवार, संदिप गंदीगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या पंचनाम्यामुळे पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला असुन आजपर्यंत कामचुकार वैद्यकिय अधिकाऱ्यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे येथील वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढत गेल्याचे दिसून येत आहे तर यापुर्वीही अनेक पंचनामे झाले आहेत पण अशा बाबीकडे वरीष्ठांचेच सहकार्य आहे की काय ? असा सवाल जतेतून उपस्थित केला जात आहे.


कालच पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भेट देऊनही वैद्किय अधिक्षकासह 9 वैद्यकिय अधिकारी गैरहजर राहतात ही अत्यंत निंदनीय बाब आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याच सुविधा नसुन साधी वाफ देण्याची मशीन सुध्दा येथे नाही यामुळे आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालुन येथे सर्व सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात व संबंधीतावर योग्य ती कार्यवाही करावी.

शाम एमेकर
नगरसेवक, मुखेड


उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराबाबत अनेकदा पंचनामे झाले पण येथील वैद्यकिय अधिका­ऱ्यावर याचा परिणात दिसुन येम नाही यासाठी आरोग्य प्रशासन सुध्दा जबाबदार आहे. येथील कर्मचा­यांना मास्क, सॅनिटाईज सुध्दा उपलब्ध होत नाहीत. चार तालुक्यातील कोरोना रुग्णांची देखभाल येथे होणार आहे पण येथे कोणत्याच सुविधा अजुनतरी दिसत नाही .

प्रा. विनोद आडेपवार
नगरसेवक, मुखेड