कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडुन सर्वोपतरी मदत करणार – पालकमंत्री अशोकराव चव्हाण 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड तहसील  कार्यालयात  कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्याच्या विशेष आढावा बैठकीत केले प्रतिपादन

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

 कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकार योग्य ती पाऊले उचलत असुन कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडुन लागेल ती  सर्वोपतरी मदत करणार असून सरकार यात कुठेही कमी पडणार नसल्याचे प्रतिपादन नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या विशेष आढावा बैठकीत मुखेड तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या दि. 13 रोजी म्हणाले.

या बैठकीस जि. प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार डॉ. तुषार राठोड,  माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरोदे, तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी के.व्हि. बळवंत, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, वैद्यकीय अधीक्षक आनंद पाटील, पोनि नरसिंग आकुसकर,सहाय्यक पोलीस निरिक्षक भाउसाहेब मगरे, पोलिस निरीक्षक गणेश चित्ते,नोडल अधिकारी डॉ.नागेश लखमावार, ता.कृषी अधिकारी शिवाजी शितोळे, काँग्रेसचे शेषेराव चव्हाण, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, नायब तहसीलदार महेश हांडे, पेशकर गुलाब शेख,  व्यंकटराव  लोहबंदे, संतोष बोनलेवाड, दिलीप कोडगिरे, उत्तमअण्णा चौधरी, दत्तुअण्णा चौधरी, डॉ श्रावण रॅपनवाड, नगरसेवक विनोद आडेपवार, श्याम एमेकर, मैनोद्दिन शेख, डॉ.रणजित काळे,सुरेश पा. बेळीकर, जयभीम  सोनकांबळे , मारोती घाटे, जयप्रकाश कानगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान या बैठकीत स्थलांतरीत कामगार , मोठया शहरातून आलेले नागरिकांची ,ज्यांना राशन कार्ड नाही अशा नागरीकांची  यादी तयार  करुन त्यांना राशन देणे, भविष्यात पाणीटंचाई भासु नये यासाठी विहीर, बोअर अधिग्रहण करणे , मुखेडमध्ये स्थलांतरीत झालेले 3 हजार 500 कुटुंबानाही राशन देण्याविषयी सकारात्मक चर्चा होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रत्येक अनुयायांनी घरातच साजरी करावी जेणे करुन कोरोना संसर्ग होणार नाही असे पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले.

पत्रकार परिषदेत अनेक पत्रकरांनी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर येत नसल्याची तक्रार करत मोठा दवाखाना बांधुनही मुखेडला याचाच कसल्याच प्रकारचा फायदा झाला नसुन स्थानिक प्रशासन याबाबत कुचकामी व सपशेल अपयशी असल्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना सांगितले याबाबत अशोकराच चव्हाण यांनी याबाबत कठोर पाऊले उचलुन स्वत: लक्ष देणार असल्याचे सांगितले व उपजिल्हा रुग्णालयात 50 बेडचे विशेष कोरोना रुग्णालय तयार होत असल्याने तेथे  भेट देऊन आढावा घेतला. तर  शिवाजी  पाटील  अंबुलगेकर  यांनी  वडिलाची  पुण्यतिथी  साजरी  न करता  मुख्यमंत्री  सहायता  निधीत २१ हजार  रुपयाचा  धनादेश  दिला . या बैठकीस आरोग्य, महसुल, पंचायत समिती व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

आमदारांना उत्तर देता आले नाही…मुखेड उपजिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभाराविषयी पत्रकारांनी पालकमंत्र्यांना विचालेल्या प्रश्नास आमदाराने उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण आपणही या भोंगळ कारभाराविषयी हतबल झालो आहोत अशी जणु कबुलीच देऊन  याबाबत  ठोस  उत्तर  देता  आले  नाही .

सोशल डिस्टन्सींगचा फज्जा..
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते काही गरीब लोकांना धान्य वाटप करण्यात आले. पण नेत्यांच्या समोर समोर करण्याच्या नादात अनेक बडया नेत्यांनी सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. यामुळे इतरांना ज्ञान सांगणारे आज तेच सोशल  डिस्टन्सींगची ऐशी की तैशी करतानाही दिसत  होते .


डॉक्टरच नसतील तर काय फायदा रुग्णालयाचा…
सरकारने नांदेड नंतर मुखेड येथे विशेष कोरोना रुग्णालय मंजुर केले पण डॉक्टरची सेवाच नसेल तर या रुग्णालयाचा काहीच फायदा होणार नाही. हे रुग्णालय म्हणजे शोभेचे वास्तु होऊ नये यासाठी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर  येत  नसल्याने  येथेही  येथेही  अशी  परिस्थिती  उद्भवू  नये  यासाठी  याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे .