दिव्यांग सहायता कक्ष मुखेडच्या वतीने १०० भाजीपाला किट वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : संदिप पिल्लेवाड

नांदेड जिल्हा समाजकल्याण अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने मुखेड शहरातील दिव्यांग ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, परिचारिका,पोलिस प्रशासन,पत्रकार,माझी सैनिक,विधवा,निराधार गरजु कुटुंबांना भाजीपाला किट चे वाटप करण्यात आले.
कोरोना या विषाणूजन्य आजाराने सर्व जग काबीज केल्यामुळे संपूर्ण जगातील मानवी जीवनात मोठी दहशत पसरली आहे.भारतामधे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी संचारबंदी लागु केल्या मुळे समाजातील अनेक घटकावर त्याचा परिणाम झाला आहे .या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना या महाभयंकर आजारापासून इतरांना वचवण्या साठी सेवा करणाऱ्या डॉक्टर,परिचारिका,पोलिस प्रशासन ,पत्रकार त्याचबरोबर दिव्यांग ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक,विधवा निराधार व गरजु कुटुंबांना जिल्हा समाजकल्याण विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकडून शहरातील दिव्यांग-५५, रुग्णालय-२५, पोलिस ठाणे-१०, पत्रकार-०२, ज्येष्ठ नागरिक-०५, निराधार-०३ असे एकूण १०० गरजूंना भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आडुलवार साहेब यांच्या मार्गदर्शनखाली दिव्यांग सहायता कक्ष मुखेड व जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयच्या टीमने मेहनत घेऊन हे सामाजिक कार्य केले.
सदरील भाजीपाला किट वाटप शिरबरतल एस.एम., पवार यू.एच., टिकोरे आर. डी, जमदाडे मामा आदिंनी केले.