समान्य व्यक्तिचे मानुसकीचे पाऊल वाढदिवसा निमित्त मुख्यमंत्री साहयता निधीला दिले आकरा हजार रुपये

नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : संदिप पिल्लेवाड

जगात कोरोणा या महामारीचे भय्यान संकटात उभे असून भारत ही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा मोठ्या त्रिवतेने फैलाव होत असून देश व राज्यावर आर्थिक संकाटाची चिन्ह दिसून येत आहेत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवहान केले आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एका खाजगी संस्थेत सेवा करणाऱ्या अरुण कुलकर्णी यांनी त्यांच्या वाढदिवसा दिनी मुख्यमंत्री साहयता कक्षासाठी आकरा हजार रूपायाचा धनादेश जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे सुपर्द केला. कोरोणाने जगभरात धुमाकुळ घातला असून भारतात हि प्रादुर्भाव वाढत आहे सध्या देशभर लॉक डाउन असून कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता लॉक डाउन 15 ते 21 दिवस वाढण्याची परिस्थिती ओढावली आहे. सध्या राज्यातील परिस्तिथि पाहता आर्थिक संकाटावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने देशातील जनतेला
आर्थिक सहायता कक्षाला फंड देण्याची मागणी केली आहे .
मुखेड तालुक्यातील एका खाजगी संस्थेत रोजनदारी वर अधीक्षक पदावर काम करणारे अरुण प्रभाकराव कुलकर्णी यांनी त्यांच्या 47 व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहयता कक्षाला आकरा हजार रूपायाचा फंड
नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी त्यांचे कुटुंबीय व मित्र उपस्थि होते.
अरुण कुलकर्णी यांनी जमेल त्यांनी जमेल तसे प्राधानमंत्री व मुख्यमंत्री साहयता निधिला मदत करण्याची विनंती केली आहे.