ज्योतिराव फुले, डॉ, बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती घरीच साजरी करा — गंगाधर सोंडारे

नांदेड जिल्हा मुखेड

भारतीय बौध्द महासभा मुखेड यांच्यावतीने जाहीर नम्र आवाहन

मुखेड :  संदिप पिल्लेवाड

सर्व बौध्द उपासक, उपसिका, आंबेडकरवादी जनतेस नम्र आवाहन आहे की संपूर्ण देशासह जगामध्ये कोरोणा व्हायरस मुळे जनता भयभीत झाली असून देशावर खूप मोठे संकट आहे.
दि.११ एप्रिल रोजी क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती व १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे
त्यानिमित्त कोटी कोटी वंदन आपण महापुरुषांची सयुंक्त जयंती कशी साजरी करावी
यासंबंधी भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भीमराव आंबेडकर व
वंचित बहुजन आघाडीचे नेते
मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सूचनाची अंमलबजावणी करावी व महापुरुषांची जयंती घरीच साजरी करावी असे आवाहन भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष गंगाधर सोंडारे यांनी केले आहे सध्या देशात संचारबंदी लागू असल्याने
पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमता येणार नसल्याने
आपण कायद्याचे पालन करत आहोत याचे भान ठेवून सयुंक्त
जयंती साजरी करावयाची आहे.
दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता आप आपल्या घरीच कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून तथागत गौतम बुद्ध क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची प्रतिमा खुर्ची किंवा टेबलवर मांडणी करून अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करावी उपलब्धतेप्रमाणे पुष्प वाहून अभिवादन करुन सामूहिक वंदना पठण करावी व जयघोष करावा दिवसभर १८ तास अभ्यास उपक्रमात महामानवाचे परिवर्तनवादी वैचारिक ग्रंथ वाचन करावे सायंकाळी आपापल्या घरावर शक्य असेल
तर विधुत रोषणाई करावी, मेणबत्ती, दिवे लावून उत्सव साजरा करावा. गोडधोड पदार्थ करून भोजन करावे
जमेल त्यांनी हातावर पोट असणाऱ्या आजू बाजूच्या परिसरातील गोरगरीब कुटुंबाला अन्नधान्य वाटप करावे. या पद्धतीने आपण जयंती साजरी करून बाबासाहेबांचे अनुयायी किती शिस्तप्रिय आहोत हे दाखवून द्यावे.
असे नम्र आवाहन भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष गंगाधर सोंडारे बावलगावकर तालुका सरचिटणीस दीपक लोहबंदे, कोषाध्यक्ष बाबुराव एन, घोडके डॉ, राहुल कांबळे, उत्तम गवळे, अविनाश कांबळे, दत्तात्रय कांबळे,गुंडेराव गायकवाड,
कमलाकर घोडके किरण भद्रे, शिवाजी गायकवाड, नितीन गायकवाड, संतोष गवळे, मिलिंद गायकवाड,गायकवाड के, एस, व इतर सर्व पदाधिकारी
यांनी केले आहे

घरीच राहा, सुखी राहा

भवत्तु सब मंगल