मुखेडात राशन दुकान वाल्यांचा मनमानी कारभार ; पावती देण्यास नकार

नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड  : संदिप पिल्लेवाड

देशातच नव्हे तर पुर्ण जगात कोरोना विषाणुंने थैमान घातला असुन दि. २३ मार्च पासुन २१ दिवसासाठी देशात संचारबंदी लागु केल्याने जनतेला घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. यामुळे अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची खबरदारी घेऊन शासनाने मोफत राशन देण्याचे ठरवले असुन अद्याप ते राशन नागरिकांपर्यंत पोहचले नाही. पण २ रु कीलो गहु व ३ रु कीलो तांदुळ या भावाने चालु महीन्याचे राशन नागरिकांना भेटत आहे. पण राशन दुकान वाले मनमानी कारभार करुन पैसे जास्त आकारत आहेत पण पावतीची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ करत आहेत.
शहरात जवळपास एकुण ११ राशन दुकाने आहेत. यातील बहुतांश दुकानदार ३६ रुपयाचे राशन असेल तर नागरिकांकडुन ४०-५० रुपये आकारत आहेत व ग्राहकांने पावतीची मागणी केल्याने “त्या पावत्या आम्हाला हिशोबासाठी लागतात” असे उडवा उडवीचे उत्तरे देऊन पावती देण्यास टाळाटाळ करत आहेत.
प्रशासनाने राशन दुकानदारांकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी फसवणुक थांबवावे व त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.