मुदखेड पालकमंत्र्यांनी दिलेल्या अन्नधान्याचे फोटो प्रसारित करून पदाधिकाऱ्यांची ‘चमकोगिरी’ वाढली

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुदखेड

मुदखेड : रुखमाजी शिंदे

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी/ लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारामुळे विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याच्या किट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत,परंतु स्थानिकचे काहीपदाधिकारी,नगरसेवक,संचालक,
आजी,माजी,सभापती,सरपंच,चेअरमन हे जणू काही स्वखर्चातून व गरिबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केल्या सारखे भासवून गरजूची इच्छा नसताना सुध्दा फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असल्यामुळे ‘चमकोगिरी’ करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.

कोरोनाची साथ रोखण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे.परिणामी रोजंदारी कामगार व अनेक गरीब कुटुंबापुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेजारील गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक राजकीय व बिनराजकीय संघटना,व्यापारी महासंघ,विविध संस्था यांच्या माध्यमातून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला.यातून मुदखेड तालुक्यातील गोरगरिबांना आपल्या घरपोच मदत मिळत आहे. मात्र या भीषण परिस्थितीत तालुक्यातील काही स्थानिक पदाधिकारी मोजक्याच आणि आपल्या मर्जीतील नागरिकांना मोजक्याच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून ‘चमकोगिरी’ करत आहेत. दुसरीकडे कोणत्याही राजकीय स्थानिक पुढाऱ्यांने ग्रामीण भागात स्वखर्चाने अन्नधान्य पुरवठा केलेले नाही,पालकमंत्र्यांच्या मदतीस दाखवून स्थानिक पदाधिकारी फोटोची हाैस पूर्ण करुन घेत असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकत आहेत,दुसरीकडे अजूनही काही गावातील गोरगरीबांना मदत पोहोचली नाही,याकडे मात्र कोणत्याही राजकीय राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष्य नाही,मदत वाटप करताना प्रचार करण्याचा संधी सोडत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त होत आहे.

काही लोकांनी आम्हाला थोडासे किराणा सामान दिले व फोटो काढून ते फेसबुकवर टाकले.यामुळे आम्हाला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले. त्या वस्तू न घेता जर उपाशी राहिलो असतो, तर ते चांगले झाले असते.असे अनेकांनी व्यक्त केले गोरगरिबांना मदत आवश्य करा परंतु गोरगरिबांचे फोटो प्रसारित करून त्यांच्या गरिबीचा तमाशा करणे टाका हे अत्यंत चुकीचे होत आहे.अशा भावना अनेक गरीब सुजान नागरिक व्यक्त करत आहेत.