ज्या नागरीकांना कोणतेही राशन कार्ड नाही आशा कुंटुंबाना शासनाने आधार कार्डवर धान्य मोफत दयावे – माधवराव पाटील देवसरकर यांची शासनाकडे मागणी

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

दत्ता  पाटील  माळेगावे

गत 15 दिवसापासुन राज्यसह तालुक्यातील जनता स्वत:ची लढाई बरोबर शासनाच्या आदेशाचे देखिल पालन करत आहे. शासनाने देखिल कोरोणा महामारीच्या संकटात नागरीकाना राशन कार्डवर राशन देण्याचे धोरण आखले आहे. परंतु आज पण बर्‍याच नागरीकाकडे कोणतेच राशन कार्ड नाही परंतु ते कोरोणा महामारीवर मात करण्यासाठी सर्वा सोबत आहेत. तेव्हा त्यांचा देखिल विचार करून अशा नागरीकांना देखिल कोरोणा महामारी वर मात करताना आधार मिळावा असा विचार करून त्यांच्याकडील आधार कार्डवर शासनाने मोफत राशनाचा आधार दयावा आशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी शासनाकडे केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोरोणा या जागतीक महामारीवर मात करण्यासाठी जनतेला घरातच बसण्याचे आव्हाण केले आहे. त्यांच्या आदेशाचे पालन देशातील जनता देखिल करताना दिसून येत आहे. परंतु दैनदिनी उपजिवीका पारपाडताना ज्या समस्या उदभवत आहेत. त्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळया धोरणाची आमलबजावणी केली जात आहे. त्याचा आधार सर्व स्तरावरील गरजु जनताला मिळणे आवश्यक आहे. त्याच हेतूने केशरी व पिवळया राशन कार्डवर धान्य दिले जात आहे. याचा सर्व तालुक्यातील नागरीक तसेच खेडयातील नागरीकांना व गरजु ना त्यांचा लाभ मिळणार आहे. ते दिले जाणार राशन हे मोफत दिले जावे तसेच बहूतांश तालुक्यातील जनतेकडे केशरी व पिवळी राशन कार्ड नाही आहे.

तेव्हा त्यांना आधार कार्डवर राशन मिळाले तर त्यांची उपजिवीका भागवली जाण्याची शक्यता आहे. त्यांना आधारकार्डवर राशन दिले जावे, त्याच बरोबर परिवहण कर तीन महिण्याचा मोफत करण्यात यावा, संशयीत रूग्णाची तपासणी मोफत करण्यात यावी , शेतकरी वर्गाना आंगामी पैरणी साठी आपासुन शेती उपयुक्त साधने (आवाजारे, खते व इतर ) विक्रत घेऊन साठा करून ठेवावी लागतात . तेव्हा शेतकरी वर्गाला पोलिस प्रशासनाकडून कोणताही त्रास होणार नाही या हेतुने सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातुन केली आहे. त्याच बरोबर सर्व नागरीकांनी डॉक्टर, पोलिस प्रशासन, नर्स, तालुका प्रशासनास सहकार्य करून घरात बसून शासनाच्या नियमाचे पालन करावे असे आवाहण त्यांनी जनतेला केले आहे.