मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
मुखेडातील नागरीकांनी मिळुन कोरोनाच्या संकटकाळात भव्य रक्तदानाचे आयोजन शहरातील आर्यवैश्य मंगल कार्यालय येथे दि. 11 रोजी करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 71 बाटल्या रक्तदान करण्यात आल्या.
त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी संयोजक विनोद दंडलवाड यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुखेडकरांनी स्वत:हुन घराच्या बाहेर येत सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत 71 बाटल्या रक्तदान केले. रक्तदात्यास फुलाचे पुष्पगुच्छ देत प्रमाणपत्रही वितरण करण्यात आले.
या रक्तदान कार्यक्रमास आ.डॉ. तुषार राठोड, पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, मुख्याधिकारी त्र्यंबक गवाले, पोउनि गजानन काळे,डॉ. विरभद्र हिमगिरे,माजी नगराध्यक्ष अनिल जाजु, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, शाम एमेकर, काँग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगिरे ,राहुल लोहबंदे,विठठल इंगळे,डॉ. श्रावण रॅपनवाड, नपाचे बलभिम शेंडगे, किशोरसिंह चौहाण, महेश मुक्कावार, संजय वाघमारे, शंकर नाईनवाड, संयोजक विनोद दंडलवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.