शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी तिघाविरोध मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : प्रतिनिधी

संचारबंदीच्या काळात ट्रँक्टर व्दारे अवैध रित्या वाळु वाहतूक करीत असताना बामणी रस्त्यावर मिळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखा नांदेड हे चौकशी करीत असताना आरोपीतानी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी तिघा विरोध मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे.

राज्यात कोरोणा व्हायरसचा वाढता प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासनाने राज्यात संचार बंदी लागू केल्यामुळे पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.याअनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांचे पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखा नांदेड हे गस्त घालत असताना ट्रँक्टर क्रमांक ए.पी.-१५- बि.एम.- २०४६ मध्ये काळी रेती भरुन अवैधरित्या बामणी रस्त्यावर वाहतूक करताना मिळून आले.

यानंतर पोलीस विचारपूस करीत असताना आरोपीतानी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा करुण त्याठिकाणाहून ट्रँक्टर घेऊन पळून गेल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड च्या पोहेका.दशरथ खंडेराव जांभळीकर यांच्या फिर्यादीवरुन बालाजी बरमे ,बालाजी राठोड,संतोष राठोड सर्व रा.वंडगीर यांच्या विरुद्ध मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये गुरनं ६०/ २०२० कलम ३५३ ,३७९,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे.पुढील तपास सपोनि कमलाकर गड्डीमे हे करीत आहेत.