हदगाव मध्ये पोलीस प्रशासनाकडून कडक धोरणाची अंमलबजावणी पोलीस उपनिरीक्षक ईटोबोने यांनी घेतली सिंघम ची भूमिका 100 हून अधिक गाड्या लावल्या पोलीस स्टेशनला

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद  हुंडेकर

कोरोनाने जगभरात थैमान घातले असून देशातीही कोरोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र कडेकोट पालन करण्यात आले असून. मात्र लोकांनी गर्दी करणे, बाहेर पडणे काही सोडले नाही. त्यामुळे आज संचारबंदी असताना आज हदगाव शहरात नागरिकांनी गर्दी केल्याने अखेर पोलिसांनी दंडुकेशाही वापर करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला.

कोरोना चा वाढता प्रदूभाव पाहता राज्य शासनाकडून दररोज नियमात बदल करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी गर्दी करू नये स्वतःची काळजी घेऊन इतरांना याचा त्रास होता कामा नये अशा सूचना देऊनही हदगावकर पोलिसांना जुमानत नसल्याने आज पुन्हा हदगाव येथील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक इटूबोने त्यांच्यासोबत कॉन्स्टेबल गायकवाड गणेश भिडे हंबर्डे यांच्यासह अनेक पोलीस बंदोबस्तात आज हदगाव मध्ये चौकाचौकांमध्ये पोलीस तैनात होते.

पोलीस कर्मचारी सकाळी आठ वाजताच रस्त्यावर उतरल्यामुळे हि वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती त्याच धर्तीवर हदगाव शहरामधील 100 हून अधिक गाड्यावर कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक इटूबोने सर्व टीम सकाळी आठ वाजल्यापासून रस्त्यात असल्यामुळे गावकऱ्यांना चांगलीच धसकी बसलेली दिसून आली आहे व पोलिस प्रशासनाला दंडात्मक कारवाई करून त्यांचे वाहने पोलिस स्टेशनला लावण्यात आली आहे त्यामुळे यानंतर तरी हदगावकर दुचाकी बाहेर घेऊन फिरणार नाहीत ही चांगलीच वचक हदगाव करांच्या मनात बसली आहे

 


अत्यावश्यक वस्तू खरेदी करताना अथवा बाहेर पडावे शिवाय इतर कोणी कोणत्याही कारणाकरिता घराबाहेर पडू नये .पालकांनी आपले मुलांना घरा बाहेर पडण्यास मनाई करावी. प्रत्येकाने स्वतःच निर्बंध घालावे. संचारबंदी चालू आहे. त्याचे उल्लंघन करू नये. त्याकरिता प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे. जेणेकरून विषाणू प्रतिबंध होऊन या महाभयानक संकटावर मात करता येईल

पोलीस उपनिरीक्षक
ईटूबोने ए पी