जलसंधारण म्हणजे काय? त्याची गरज, महत्त्व व कार्य

इतर लेख संपादकीय

भारत हा कृषिप्रधान देश आहे.आजही भारतातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक लोक ग्रामिण भागात वास्तव्य करतात या बहुसंख्य लोकांच्या उपजिवीकेचे व रोजगार पुरविण्याचे साधन म्हणून शेती व तिच्याशी निगडित व्यवसायाकडे पाहिले जाते.

मानवाच्या मुलभूत गरजा पैकी पाणी ही एक अत्यावश्यक गरज आहे.त्यामुळे पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते.पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्राचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे.म्हणुन पुर्वीपासून पाण्याच्या सानिध्यात सजीवसृष्टी दिसून येते.पृथ्वीवरील पाण्याचा अभ्यास केला तर एकूण उपलब्ध जलसंपत्ती पैकी 97 टक्के पाणी हे समुद्रात तर 2 टक्के पाणी हे ध्रुवावर बर्फ आणि हिम या स्वरुपात आहे व केवळ 1टक्का पाणी मानवाच्या विविध गरजांसाठी आहे.या एक टक्यातुन 0. 37टक्के पाणी हे दुषीत आहे.
पाणलोट क्षेत्र विकास संकल्पने विषयी महाराष्ट्रात प्रथमतः 1887 मध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी आपले विचार मांडले.त्यानंतर 1928 साली राॅयल कृषिआयोगाच्या शिफारशी प्रमाणे कोरडवाहू संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले.आणि त्यानंतर 1937 साली मृद व जलसंधारणाला सुरुवात झाली 1972 ते 1977 नंतर या कामाला गती मिळाली.

जलसंधारण म्हणजे काय?

जलसंधारण म्हटलं की आपणास हे शासनाचे काम असे वाटते.परंतु ते तसे नाही.जलसंधारण हे स्वत: शेतकऱ्यांनी करावयाचे कामे आहेत.उदा.’ पावसाचे पाणी शेतात जिथे पडेल तिथेच मुरवणे म्हणजे जलसंधारण होय.’
“पाणी अडवा पाणी जिरवा” या उक्ती प्रमाणे पाऊस शेतबांधाच्या बाहेर न जाऊ देता शेतातच जिरवणे जेणेकरून जास्त पाणी पीक वाढीसाठी उपलब्ध राहील व कमी पावसाच्या दिवसांमध्ये सुद्धा पिकावर परिणाम जाणवत नाही.
जलसंधारण ही केवळ शेतात किंवा गावांमध्ये करायची गोष्ट नाही तर ती पृथ्वी वर कुठे ही आथवा शहरांमध्ये सुद्धा गरजेचे आहे.शहरामध्ये बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा हे सरकार मार्फत होतो.काही लोकांना त्याची गरज लक्षात येत नाही.पाणी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.म्हणुन शहरात वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम आमलात आणायला हवं.पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना हे जलसंधारणचाच एक भाग होय.भूपृष्ठावरील प्रत्येक जलाशयास व प्रत्येक जलप्रवाहास त्याचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र व एकत्र आल्यावर त्याचे मोठे एकत्रित क्षेत्र तयार होते व असे अनेक प्रवाह एकत्र येऊन जेव्हा ते एखाद्या नदीस मिळतात तेव्हा त्याचे नदीखोरे तयार होते.
महाराष्ट्र शासन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या टिपणीनुसार ” जमिन सहसा कधी समपातळीत नसते.त्यात उंच सखलपणा असतोच.डोंगर,पर्वत टेकड्या,उंचवटे,घळी,खोरे अशी त्यात विभागणी असते.त्यामुळे पावसाचे पाणी उंच भागाकडून वाहत येऊन ओढयाला मिळते त्या सर्व भूभागास त्या ओढ्याचे पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.”
राज्यातील सर्वसाधारण क्षेत्रात व अवर्षण प्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली जमिनींची धूप,पावसाचे पाणी अडवण्याची व साठवण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे पाणलोट क्षेत्र आधारित जलसंधारण व मृद संधारणासाठी अनेक उपचार केंद्र सरकार व राज्य सरकार करीत असते.
जमिनीत पाणी अडविणे जिरवणे याबरोबरच भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे तसेच वाहुन जाणारे मातीचे संवर्धन करणे हे मुख्य उद्देश आहेत.मृद व जलसंधारणाची सर्व कामे (उपचार) पाणलोट क्षेत्र आधारित घेण्यात येतात.पाणलोट उपचार राबविताना तांत्रिक दृष्ट्या योग्य जागेची निवड क्षेत्रिय कर्मचारी कडून करण्यात येते.त्यामध्ये पाणलोटातील क्षेत्र उपचाराचा व नाला उपचाराचा समावेश असतो.पाणलोट उपचार राबविताना संबंधित पाणलोटामधील 67 टक्के लाभार्थीची समंती आवश्यक असते.

जलसंधारणाची गरज व महत्त्व
पाणी (H2O) हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. ते प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्यांच्या घन रूपाला बर्फ व वायुरूपाला वाफ म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. त्या वाफेला थंडी लागताच त्यांचे रूपांतर द्रवरूपात म्हणजे पाण्यात होते. तसेच बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले की त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठा केंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे . पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो. मासे पाण्यातील ऑक्सिजन घेऊन जिवंत राहतात. पाण्याच्या एका विशिष्ट गुणधर्मामुळे सृष्टीमध्ये पाण्याचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. पाण्याचे तापमान कमी केले असता ०° सेल्सियस तापमानाला ते घनरुप घेऊ लागते. तापमान अजून कमी केल्यास ४°सेल्सियस तापमानापर्यंत ते आकुंचन पावते. परंतु त्यापेक्षा कमी तापमान झाल्यास पाणी प्रसरण पावू लागते आणि त्याची घनता कमी होते आणि त्याबरोबरच परिणामी ४°सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असलेल्या पाण्यावर तरंगू लागते. याला पाण्याची अपवादात्मक प्रसरणशीलता म्हणतात. यामुळे बर्फाळ प्रदेशातील जलचर बर्फाखालील पाण्यात जगत असतात. अणु बॉंब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार मानला जातो. पाणी ही माणसाची मुलभूत गरज आहे .
सन 2019 च्या अहवालात केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केलेल्या पाहणीत राज्यातील 37/ नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे.
राज्याचा भविष्यातील पाण्याचा वापर विचारात घेतला असता ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.भविष्यात पाणी हे फार मोठी समस्या राहणार आहे.राज्यात एकूण 627 नद्या आहेत व इतर जलस्रोत उपनद्या,ओढे,नावे,झरे,छोटी-मोठी धरणे, नैसर्गिक तलाव,पाझर तलाव, पाटबंधारे तलाव वगैरे मिळून राज्यात एकूण 5 लाख 92 हजार 0743 नैसर्गिक स्रोत आहेत.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत 4 लाख 66 हजार 893 जलस्त्रोतांचे तपासणी केली असता या अहवालात यापैकी 1 लाख 73 हजार 484 ऐवढी प्रदुषित जलस्रोत आढळून आले आहेत.केंद्रीय पातळीवर नदी पुनरुत्थान समिती स्थापन करण्यात आली आहे.

पावसाचं पडलेलं पाणी त्याच परिसरात योग्य जागी, शास्त्रीय पद्धतीने अडवून जिरवून नंतरच्या काळात वापरण्यासाठी उपलब्ध करून ठेवणे म्हणजे पर्जन्य जलसंधारण. त्याचे वापरानुसार दोन प्रकार आहेत.

१. तात्पुरता वापर – पावसाळा चालू असताना, पावसाचे पाणी (साधारण ४-५ दिवस पुरेल इतकं) साठवून ठेवून ते वापरत राहणं.

२. पावसाळा संपल्यावर वापर – पावसाचं पडलेलं पाणी टाकीत, विहिरीत, बोअरवेलमध्ये किंवा इतर ठिकाणी साठवून ठेवून ते पावसाळा संपल्यावर वापरणे.

पर्जन्य जलसंधारण हे शहरात आणि खेड्यांत दोन्हीकडे उत्तम प्रकारे करता येते.

शहर, नागरी वस्तीतील जलसंधारण आणि संवर्धन
शहरात पडलेल्या पावसाचे पाणी इमारतींच्या छतावरून पाइपद्वारे खाली असलेल्या (बहुसंख्य ठिकाणी) फरशी किंवा काँक्रीटवरून वाहून पालिकेच्या नाल्याला मिळते. तिथून ते एकत्र होत जवळच्या ओढा, नाले, नदी, खाडी किंवा समुद्र यांना जाऊन मिळते.

पृष्ठभागानुसार पाणी जिरेल की वाहील आणि किती जिरेल किंवा वाहणार हे ठरते. जर मोकळं मैदान किंवा माती असलेली जागा असेल तर पडणाऱ्या पाण्याच्या ५०% जमिनीत मुरते. मात्र, काँक्रीट असल्यास १०% ही पाणी मुरत नाही.
मृद व जलसंधारण ही काळाची गरज आहे.कारण पाऊस व वारा यामुळे दरवर्षी हजारो हेक्टर जमिनीची धूप होते.भारतात दरवर्षी अंदाजे 5334 दशलक्ष टन माती वाहून जाते.
शालेय स्तरावर अशा विषयांचा समावेश व्हावे म्हणून जलसुरक्षा हा विषय 9 वी ते 12 वी च्या अभ्यासक्रमात ठेवण्यात आला आहे.हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरले आहे.
* योजना व कार्यपद्धती*
केंद्र व राज्य पुरस्कृत योजना खालील प्रमाणे राबविले जातात.
A) केंद्र पुरस्कृत योजना
1) राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम
2) नदी खोरे विकास प्रकल्प
3) पश्चिम घाट विकास प्रकल्प
4) एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्य
B) राज्य पुरस्कृत योजना
1) नाबार्ड-RIDF
2) पाणलोट चळवळ
3) आदर्श गाव योजना
4) सिमेंट नालबांध बांधनी कार्यक्रम
5) पडकी कार्यक्रम
6) एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम
C) राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत
1) महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान
2) विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रम
3) राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम
अशा प्रकारे आपणास जलसंधारण दिनाचे महत्त्व समजावून घेणे आवश्यक आहे.

संकलन
महादेव शरणप्पा खळुरे
एम.ए.,एम एड्.,ए.एम.
मोबाईल 8796665555
khalurems@gmail.com