मुक्रमाबाद येथे भटक्या (फिरस्ती)लोकांना महसुल प्रशासनाकडुन अन्नधान्याचे वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुक्रमाबाद : दत्ता  पाटील  माळेगावे

मुक्रमाबाद शहरात विविध ठिकाणाहून आलेल्या भटक्या लोकांना महसुल प्रशासनाकडुन अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. भारत देशावार कोरोना या महामारीने अक्षरशः थैमान घातले असुन जनजिवन संपुर्ण पणे विस्कळीत झाले असुन संपुर्ण भारतामध्ये लॉकडाऊन घोषित केल्यामुळे देशातील नागरीक घरातच आडकुन पडले आसल्यामुळे त्यांचा जिवन जगाण्याचा प्रश्न समोर उभा टाकल्याशिवाय राहत नाही.

श्रीमंताची घरे कशीतरी चालतील पण ज्यांचे पोट हातावरच आवलंबुन आहे आशा भटक्या विमुक्त लोकांचे काय ?त्यांचा वाली कोण ? त्यांना ना घर ना दार अशा परीस्थितीमध्ये या भटक्या लोकांसाठी महसुल प्रशासन धाऊन आले आणि या भटक्या जमातीचा जिवनाधार होवुन जिवनावश्यक वस्तूंच्या स्वरुपात आन्नधान्याची किट देउन मायेची उब देण्यात आली.

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या भटक्या (फिरस्ती) गरजुनां महसुल प्रशासनाकडुन मुखेड तालुक्याचे तहसिलदार मा.काशीनाथ पाटील यांच्या हस्ते भटक्या कुटुंबाना जिवणाश्यक वस्तूंचे (अन्नधान्य किट) वाटप करण्यात आले.यावेळी विविध भागातुन आलेल्या भटक्या अनेक कुटुंबाना अन्नधान्य किट देण्यात आले.

यावेळी मंडळ अधिकारी गड्डमवार, तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर, तलाठी मारोती श्रीरामे, मा.सरपंच सदाशिव बोयवार, शेशीकांत तेलंग.पञकार अशोक लोणीकर, रज्जाक कुरेशी , आदि उपस्थित होते.