जिल्‍हयातील ग्रामीण भागात ऑडीयो पब्‍लीसीटीच्‍या माध्‍यमातून कोरोना जनजागृती अभियानाचे आयोजन क्षेत्रीय लोकसंपर्क ब्‍यूरो कार्यालयाचा उपक्रम

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या


नांदेड : वैजनाथ स्वामी

कोरोना विषाणुचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्‍यूरो नांदेडच्‍यावतीने जिल्‍हयातील ग्रामीण भागामध्‍ये जनजागृती करण्‍यात येत आहे.
दिनांक 08 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या ऑडीयो पब्‍लीसीटी कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून जिल्‍हयातील नांदेड, कंधार, नायगाव, लोहा, अर्धापुर तालुक्‍यातील 60 गावांमध्‍ये जनजागृती मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून घरी थांबणे, किराणा आणि जिवनावश्‍यक वस्‍तुंचा साठा न करने, अति महत्‍वाच्‍या वेळी बाहेर पडणे, शेती उपयोगी कामे करता येणे, गर्दी टाळणे, समाज माध्‍यमांवरिल अफवांना बळी पडु नका तसेच आरोग्‍य विषयक संदेश गावक-यानां देण्‍यात येत आहेत.

सदर अभियान दिनांक 13 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे. या अभियानात नांदेड तालुक्‍यातील धनेगाव, बळीरामपुर, गोपाळचावडी, बाभुळगाव,गुंजडेगाव, ढाकणी, वाजेगाव, काकांडी, तुप्‍पा, किक्‍की, राहेगाव, भायेगाव, विष्‍णुपुरी, पासदगाव, सुगाव, वांगी, कासापरखेडा, पासदगाव, पिपळगाव, कोटीतिर्थ, वाघी, नाळेश्‍वर, सोमेश्‍वर, राहटी, जैतापुर, पिंपरणवाडी, ढोकी, नागापुर, राहटी, पुणेगाव या गांवाचा समावेश आहे. लोहा तालुक्‍यातील किवळा, टेळकी, मारतळा, कहाळा,धनगरवाडी, जानापुरी, सोनखेड, बोरगाव, कारेगाव, हरबळ, दगडगाव, लोहा, दापशेड उस्‍माननगर या गावांमध्‍ये कोरोना विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. अर्धापुर तालुक्‍यातील , देगाव, मालेगाव, कामठा, गणपुर डेरला, पिंपळगाव, देगाव येळेगाव या गावांचा समावेश या गावांचा समावेश करण्‍यात आला आहे. मुदखेड तालुकयातील आमदुरा , इजळी, चिकाळा, मुगट, मुदखेड, ब्राम्‍हणवाडा या गावांमध्‍ये जनजागृती करण्‍यात येणार आहे.