तेलंगणात अडकलेल्या नागरिकांना देगलूरचे भूमिपुत्र अनमूलवार यांनी केली मदत

देगलूर नांदेड जिल्हा

मुखेड : प्रतिनिधी

लाँकडाऊन मुळे गरीब कुटुंबाची होणारी उपासमार पाहुन व्यथीत झालेले मुळचे देगलुरचे व तेलगांणातील राज्यातील आरमुर तालुक्यातील शाखा चोटपल्ली गावातील शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत असलेले सुनील अनमुलवार यांनी गरीब गरजु गरजू कुटुंबाना जिवन आवश्यक वस्तुसह धान्य वाटप केले.अनमुलवार यांचा हा सामाजिक उपकृम अनेकासाठी प्रेरणा देणारा आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथील भुमीपुत्र सुनील अनमुलवार हे स्टेट बँक आँफ इंडिया शाखा मुक्रमाबाद येथे त्यांनी शाखा प्रबंधक म्हणून तीन वर्षे चोख सेवा बजावली होती.त्यांच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिककर्ज देऊन मोठा आधार दिला होता.याबरोबर छोट्या मोठ्या व्यवसाय धारकांना सी.सी.लोन देऊन व्यापारी क्षेत्राताच्या प्रवाहात आणण्याचे उल्लेखनीय काम त्यांनी केले होते.

सुनील अनमुलवार यांचा शासकीय नियमानुसार कार्यकाळ संपल्यामुळे दोन वर्षापूर्वी तेलगांणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील आरमुर तालुक्यातील स्टेट बँक आँफ इंडीया शाखा चोटपल्ली येथे शाखा प्रबंधक म्हणून बदली झाली होती.तेथे पण ते कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा बजावीत आहेत.
पण सध्या देशासह राज्यात कोरोणा व्हायरस नुसता थैमान घातला आहे.यामुळे पंतप्रधान नरेद्र मोदी देशाला लाँकडाऊन केल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाला आहे.याचा सर्वात मोठा फटका गरीब मजुरी करणाऱ्या कुटुंबाना बसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आल्याचे पाहून व्यथीत झालेले सुनील अनमुलवार यांनी आपल्या शाखेच्या वतीने गरीब गरजू कुटुंबाना सोशल डिस्टींगचे पालन करीत जिवन आवश्यक वस्तुसह धान्याचे वाटप करुण त्यांना आधार दिला.

अनमुलवार यांच्या या उपकृमाबदल ज्ञानेश्वर चिंतावार,अंकुश मंदे,राजेश्वर दासरवार,अशिष पंदीलवार,राजुअप्पा स्वामी,लक्ष्मण कोळेकरसह आदीने अभिनंदन केले आहेत.