देगलूर येथे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची आढावा बैठक*

देगलूर नांदेड जिल्हा

 

देगलूर : विशाल पवार

देशामध्ये कोरोना सारख्या महामारी चालु असताना लोकांना अन्नाचा तुटवडा रोखण्यासाठी व केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज देगलूर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत देगलूर तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली आहे.

यामध्ये आपत्ती व्यवस्थापणाबाबत बैठक घेण्यात आली.गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.या वेळी आ.अमर राजुरकर,आ.रावसाहेब अंतपुरकर,जिल्हा परिषदेचे सभापती अॅड रामराव नाईक, मा. संजय बेळगे,नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बोळगे, बिडीओ राजकुमार मुक्कावार,वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सभांजी फुलारी,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आकाश देशमुख, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, तालुका कृषीआधिकारी शिवाजी शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड,पंचायत समिती सभापती संजय वलकले, प.स. माजी सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर ,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अँड प्रितम बाळासाहेब देशमुख,बालाजी थडके तसेच सर्व लोकप्रतिनिधी व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.