गुरुद्वारा बोर्डातर्फे राशन थैलयांचे वाटप ! असर्जन, महाडा आणि सिडको

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ  स्वामी

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीशी तोंड देणाऱ्या गरीब आणि गरजूं शीख कुटुंबांच्या हाकेवर गुरुद्वारा सचखंड बोर्डाने वेळीच दखल घेत त्यांना घरपोच राशन सामग्री पोहचविली आहे. बुधवार, दि. 8 रोजी गुरुद्वारा बोर्ड सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी असर्जन, महाडा, सिडको आणि वसरणी भागात स्वतः जाऊन राशनाची थैली भेट केली.

यावेळी गुरुद्वारा बोर्ड सदस्य गुरमीतसिंघ महाजन, भागिन्दरसिंघ घडीसाज, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, देवेंद्रसिंघ मोटरावाले, माजी सदस्य सुरिंदरसिंघ, अवतारसिंघ पहरेदार यांच्या सह गुरुद्वारा बोर्ड कर्मचारी आणि सेवाभावी नागरिकांची उपस्थिति होती.

नांदेड शहरात दि. 25 मार्च पासून लॉकडाउन सुरु आहे. यामुळे असंख्य शीख कुटुंब अडचणीत आले होते आणि त्यातील अनेकांनी गुरुद्वारा बोर्डाकडे राशन, पीठ, तांदूळ, साबन इत्यादि साहित्य पुरविण्याची मागणी केली होती. शीख समाजाच्या मागणीवरून गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष स. गुरविंदरसिंघ बावा, सचिव रविंदरसिंघ बुंगाई आणि स्थानीक सदस्य गुरुचरणसिंघ घडीसाज, सरदूलसिंघ फौजी, गुरमीतसिंघ महाजन, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, भागिन्दरसिंघ घडीसाज, जगबीरसिंघ शाहू, अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी गरीब शीख – शिखलीगर कुटुंबियांना घरपोच मदत देण्याची भूमिका घेतली. मदत म्हणून पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साबन अशा नऊ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तुंचे समावेश असलेली एक थैली तयार करण्यात आली. या थैलींचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यातील सर्व गरीब कुटुंबियांना मदत देण्याची तयारी गुरुद्वारा बोर्ड सदस्यांनी दाखवली आहे.