मुखेडात माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्याकडून मोफत “शिवभोजन” केंद्र सुरू 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

लाभार्थ्याव्यतिरिक्त स्वखर्चातून मोफत जेवणाची बेटमोगरेकर यांच्याकडून व्यवस्था 

मुखेड  : संदीप  पिल्लेवाड 
             कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने  लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब जनतेच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मुखेड कंधार मतदार संघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते मोंढा परिसरात दि 08 रोजी मोफत शिवभोजन थाळीचे उदघाटन करण्यात आले .
     मुखेडच्या जनतेला शिवभोजनाचा लाभ मिळावा यासाठी  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे माजी आमदार हणमंतराव पाटील यांनी मागणी केली होती त्यास मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
      कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्व सामान्य जनता अत्यंत अडचणीत असल्याने  गोरगरीब व गरजू लोकांच्या  पोटाची भूक भागवण्यासाठी लॉकडाऊन काळामध्ये शिवभोजन केंद्रात जेवण करण्यासाठी गोरगरीब जनतेस जे शुल्क द्यावयाचे असते ती सर्व रक्कम माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी स्वतः भरणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे लाभार्थ्यांना या केंद्रातून दररोज 11 ते 3 या वेळेत मोफत थाळी उपलब्ध होणार आहे.

    कोरोना विरुद्धलढत असलेल्या या लढाईमध्ये स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून काम करणारे आरोग्य कर्मचारी,  महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी,सफाई कामगार यांच्यासाठी लॉक डाऊन संपेपर्यंत शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्या व्यतिरिक्त स्वखर्चातून मोफत जेवणाची व्यवस्थाही  बेटमोगरेकर यांच्या वतीने या केंद्रात करण्यात येणार असून  शिवभोजन  केंद्र  मुखेड मध्ये  मंजूर केल्याबाबद्दल  मंत्री  अशोकराव  चव्हाण  यांचे  आभारही  बेटमोगरेकर  यांनी  मानले .


            या उदघाटन प्रसंगी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी के व्ही बळवंत, काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, प्रवक्ते दिलीप कोडगिरे, उत्तमअण्णा चौधरी, शिवसेना तालूका  प्रमुख बालाजी  कबनूरकर, संजय बेळीकर, सदाशिवराव पाटील, सुनील आरगीळे, आकाश कांबळे, जयभीम सोनकांबळे, तलाठी बालाजी बोरसुरे व केंद्र संचालक रामेश्वर इंगोले यांच्यासह अनेक नागरिक व लाभार्थी  उपस्थित होते.