पालावरील गरीबांना पोनि नरसिंग आकुसकर यांच्या हस्ते भोजनाचे डब्बे वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केल त्यामुळे अनेकांचे कामधंदे बुडाले तर अनेकांना उपासमारीची वेळ आली अशाच गोर गरीब पालावर असणाऱ्या  कुटूंबास पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या हस्ते पोळी डब्बे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील राष्ट्रीय स्वंय सेवक संघ व आपत्ती निवारण समितीच्या वतीने पोळी डब्बे प्रत्येक स्वयंसेवकाच्या घरुन संकलन करुन तालुक्यातील अतिशय गरीब व गरजुंना पोळी डब्बे देण्यात येत आहे. त्यांच्या या कार्यासही मोठा प्रतिसाद मिळत असुन रोज ८० ते १०० पोळी डब्बे संकलन करुन नित्यनियमाने वाटपाचे कार्य चालु आहे.


         पोळी डब्बे वाटप करताना पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्यासह राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे तालुका कार्यवाह भगवान गुंडावार, शेखर पाटील, योगेश पाळेकर, आकाश पोतदार, वैजनाथ दमकोंडवार, जय जोशी यांच्यासह अनेक स्वंयसेवक परिश्रम घेत आहेत.