कोरोना-लॉकडाऊनच्या काळात मानसिक व शारिरीक स्वास्थ्याची उत्तम जपवणूक – डॉ. पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ ,मुखेड)

इतर लेख संपादकीय

गेल्या चार ते पाच महिन्यापासून संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडलेल्या कोरोना-व्हायरस मुळे 23 मार्चपासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आला. विमानसेवा,रेल्वेवाहतूक, रास्तेवाहतूक बंद करण्यात आलेली आहे.सर्व शाळा,महाविध्यालये,कार्यालये,धार्मिक स्थळे बंद आहेत.सर्वांना आपापल्या घरी सुरक्षित राहण्यास सांगितले आहे.डॉक्टर,नर्सेस, पोलीस व इतर जीवनावश्यक सेवासोडल्यास इतर सर्व कामे ”वर्क फ्रॉम होम” करण्यास सांगितले आहेत.आशा या कोरोनामय वातावरणात सर्वांच्या मनामध्ये पोकळी निर्माण झाली आहे,मनामध्ये सतत भिती आहे.
या सगळ्यावर मात कशी करायची?, चांगले निरोगी जीवण कसे जगायचे?,मानसीक स्वास्थ्य चांगले कसे ठेवायचे? असे अनेक महत्वाचे प्रश्न सतत मनामध्ये घोंगावत आहेत.
या कठीण प्रसंगी आपणाला वास्तवाचं भान असणं खूप आवश्यक आहे .आपलं आयुष्य कधीच निश्चित नव्हतं आणि असणार पण नाही.वास्तव आणि विज्ञान असं सांगतं की ,कुठल्याही प्रकारचा साथीचा आजाराचा फैलाव हा घंटाकृती आकाराचा(Bell shaped curve) आलेखा सारखा असतो.साथीचा आजार येणार,एका शिखराला पोहचणार आणि उतरणीला लागणार.हा जो कर्व्ह आहे,चढाव-उतार आहे हा आपणाला हवा तसा करायचा झाल्यास ,प्रत्येकाने प्रयत्न करावे लागतील. मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जे काही करणार किंवा करणार नाही ,त्याचा थेट परिणाम समाजाच्या आणि देशाच्या व्यवस्थेवर होणार आहे.हे जर आम्हाला कळले, तर बऱ्याच समस्या सुटतील.
काळ खूप कठीण आहे,त्यामुळे आपणाला बेफिकीरीने वागून चालणार नाही.कुठल्याही कसोटीच्या काळामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी मिळत असतात (Toughest phase of life brings the Best &brings the Worst out of it). त्या दोन्हीही गोष्टी स्वीकारायची तयारी असली पाहिजे.आशा या कठीण प्रसंगांमध्ये धीर कसा टिकवायचा हे खूप महत्वाचे आहे.
कोरोनामुळे अशी एक चांगली गोष्ट पहायला मिळाली.शहर आणि खेड्यामध्ये विखुरलेले कुटूंब एकत्र येऊन रहात आहेत. शहरामध्ये जाऊन खेड्यातल्याना वेगळ्या चष्म्यामधून पाहणाऱ्याच्या डोळ्यावरचा काळा चष्मा निघून आत्मीयतेचा,प्रेमाचा चष्मा लागलेला आहे.सर्वजण एकत्र राहतात, गप्पा मरतात.
कोणत्याही आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्याची प्रत्येकाला संधी मिळत असते . अशा या कोरोनारुपी आपत्तीचे सुद्धा इष्टापत्ती मध्ये रूपांतर कसे करायचे हे आपण पाहुया.
1.नेहमी सकारात्मक राहा व विचार करा-
आपण जसा विचार करता ,तशाच गोष्टी होण्याच्या शक्यता जास्त असते.म्हणून नेहमी सकारात्मक व चांगले विचार करा.घरातील वातावरण तनावपूर्वक न ठेवता खेळीमेळीचे ठेवा.तुमच्या विचाराप्रमाणे तुम्ही घडता.
“तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर ,सामर्थ्यशाली बनाल – स्वामी विवेकानंद”
2.कुटुंबियांसोबत स्नेह वृद्धिंगत करणे-
एकमेकांना समजून घ्या,गप्पा
मारा,वृध्द व्यक्तींसोबत आत्मीयतेने वागा व बोला.त्यांच्या प्रतिकरशक्तीसोबतच मानसिक शक्ती सुद्धा वाढवा..
3.मुलांसोबत वेळ घालवा-
मुले ही देवाघरची फुले असतात.आपल्या दैनंदिन कामामुळे बरेच जण आपल्या लहानग्यांना देण्यासाठी पुरेसा वेळच नसतो असा गोड गैरसमज असणाऱ्यांनी आपल्या चिमुकल्यासोबत मस्ती करणे,बुद्धिबळ(Chess)खेळणे,बिझिनेस गेम,मोनोपॉली, सापशिडी असे खेळ खेळणे.तुम्हाला लक्षात येईल की लहान मुले तुमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे गेम्स खेळतात.
4.स्वतःसाठी वेळ काढा-
दिवसातून किमान 1 तास स्वतः साठी काढा.एकांतवासात राहा, ध्यानधारणा(मेडिटेशन),योगासणे करा,यांमुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.
5.शारिरीक आरोग्याची काळजी घ्या-
तुमच्या शारिरीक आरोग्यासाठी तुमच्या वेळापत्रकानुसार व्यायाम करा,जेवणावर नियंत्रण ठेवा,सकस आहार घ्या,वारंवार पाणी प्या,प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ‘क’ असलेले फळ खा,हिरव्यापलेभाज्या आणि प्रथिनेयुक्त आहाराचे सेवन करा.
6.समाजमाध्यमापासून दूर रहा-
Tv वरील बातम्या, whatssapp, facebbek अशा समाजमाध्यमापासून दूर राहा.महत्वाच्या सुचनांसाठी थोडा वेळ पहा.कॉमेडी शो, चित्रपट,youtube वर आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रसंबंधीत व्हिडिओ पहा.
7.तुमचे छंद जोपासा-
प्रत्येक माणसाला कोणतातरी चांगला छंद असणे अत्यंत आवश्यक आहे.छंद असल्यामुळे आपला वेळ वाया न जाता आपण सतत व्यस्त असतो.”रिकामे मन भूतांचे घर”या उक्तीप्रमाणे व्यस्त असणे आवश्यक आहे.
8. वाचन करणे-
“वाचाल तर वाचाल” या उक्तीप्रमाणे वाचन करणे खूप महत्वाचे आहे. वाचन केल्यामुळे माणसाची सृजनशीलता वाढते,धैर्य वाढते.वाचनामुळे विचार करण्याची शक्ती वाढते,कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकत वाढते.चांगल्या साहित्य वाचनामुळे सतत येणाऱ्या आपल्या विचारांची साखळी तुटून एकाग्रता वाढते.
9. सामाजिक उत्तरदायित्व पाळा-
माणूस हा समाजशील प्राणी असून ,संकटसमयी एकमेकांना मदत करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.आपल्या आजूबाजूला असलेल्या गरीब व गरजू लोकांना मदत करा PM-Cares Fund, CM-Fund याठिकाणी मदत करा.
10.घरी रहा, सुरक्षित रहा-
सध्याची सर्वात मोठे राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे घरी राहणे होय. प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत असून ,आपणास फक्त त्यांच्या सूचनांचे पालन करायचे आहे….
जाता जाता एवढंच सांगेन
उम्मीद ना टूटणे दो, हौसला ना हारो,
आत्मविश्वास की कंघी से मन के डर के बाल संवारो,
यह दुनिया उसी की हैं जीसने जीता है मन के डर को, पहचानो अंदर की शक्ती को,हर काम बेहतर बनालो |