“सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा त्या हरामखोरांवर तुमचा जोर दाखवा

Uncategorized ठळक घडामोडी महाराष्ट्र

 

मुंबई |  गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील एका तरुणाने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणानं केला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

अरे बाप रे अमानवीय ,सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये उपचार देणार्या नर्सेस समोर विकृत अश्लील चाळे करणार्या हरामखोरांवर तुमचा जोर दाखवा, असं चित्रा वाघ यांंनी म्हटलं आहे

 

संबंधीतांवर कारवाई व्हावी, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी गृंहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाणे पोलिस यांना ट‌ॅग केलं आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी आपल्याला रुग्णालयात दाखल केलं, असं या तरुणानं म्हटलंय. रुग्णालयातून सुटल्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशन गाठत या तरुणानं यासंदर्भात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.