जि.प अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांचा बाराहाळी गटात मदतीचा हात

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

 हातावरचे पोट असणा­ऱ्यास केले धान्य वाटप

मुखेड : पवन जगडमवार

कोरोनाचा काळ अत्यंत भयंकर त्यात लॉकडाऊन , हाताला काम नाही अगोदरच मुखेड तालुका डोंगराळ व खडकाळ भाग त्यामुळे येथील स्थलांतराचे प्रमाण ही जास्त आहे अशा परिस्थितीत माणूसकीचे दर्शन घडवत नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी सुरेशराव अंबुलेकर यांनी बाह्राळी मतदार संघातील गोर गरीब, वंचित, हातावरचे पोट असणाऱ्यां नागरिकांना अन्न धान्य वाटप केले.

कोराना विषाणामुळे अनेकांच्या हाताला असणारे काम बंद झाले त्यामुळे अनेक गोर गरीबांच्या चुली बंद झाल्या. काय करावे कळेना ? दोन वेळेसचे जेवण बनविण्यासाठी सुध्दा घरातील डब्यात धान्य नाही.

अशा संकटात असताना जिल्हा परिषद बाह्राळी गटाचे प्रतिनिधी कॉग्रेस नेत्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर मतदारांसाठी धाऊन आले व बाहेरगावी अडकलेल्या मजुराच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्ती ,लहान मुले नागरिकांना त्यांनी गहु,तांदुळ तेल व इतर धान्य वाटप केले. यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, सुरेश आंबुलगेकर,अनिता कांबळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.