लोहबंदे परिवाराच्यावतीने भोजनदान व मास्क वाटप : राहुल लोहबंदे मित्रमंडळाचा उपक्रम

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप  पिल्लेवाड

सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे परिवाराच्या वतीने शहरात लाॅकडाऊन काळात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस बांधवांना खिचडी वाटप व मास्क वाटप करण्यात आले.

शहरातील प्रभाग क्र. १ मध्ये नगरसेविका सौ.रेखा दिपक लोहबंदे यांच्या पुढाकारातून निर्जंतूकीकरण औषधी फवारणी करण्यात आली. राहूल लोहबंदे मित्रमंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याउपक्रमात जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, माजी सरपंच बापूराव कांबळे, माजी नगरसेवक राहूल लोहबंदे, सौ.रेखा दिपक लोहबंदे, दिपक लोहबंदे सर आदींनी सहभाग घेतला आहे.