दर्ग्यातील दिव्याचा ‘ प्रकाश’ …… धार्मिक सहिष्णुता उजाळणार .!

नांदेड जिल्हा लोहा

लोहा : इमाम  लदाफ 

वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना विरोधात एकजुटीने लढण्याची ताकद सर्वांच्या  मनात निर्माण व्हावी यासाठी देशभरात दीप प्रज्वलन करण्यात आले .अशा काळात जुन्या लोहयात नालेहैदर दर्ग्यात पत्रकार इमाम वजीर साब लदाफ व त्यांच्या मुलीने दिवा लावला .आणि दुवा मागितली.. या दिव्याचा प्रकाश धार्मिक सहिष्णुता मनामनात प्रज्वलित करणारा ठरला
कोरोना विरुद्ध केंद्र व राज्य सरकार कठोर उपाययोजना आखत आहे ..जिल्हा -तालुका प्रशासन -पोलिस यंत्रणा- आरोग्य कर्मचारी- स्वच्छता कर्मचारी अहोरात्र जीव मुठीत घेऊन या संकटावर मात करत आहेत.

या लॉकडाऊन काळात विशिष्ट समुहाबाबतच्या व्हिडिओ- बातम्या- सोशल मीडियातून’ व्हायरल ‘होत आहेत त्या फेक न्यूज मुळे गावातील… शहर… नगर यातील समाजमनात ‘भेद’ निर्माण झाला ..या द्वेषाचा ‘व्हायरस’ आपुलकी..मानवता…आपण सारे एक ..या परंपरेला छिद्र ..पडणार ठरला ..अशा सामाजिक द्वेषमूलक वातावरणात अनेक जण आपली ‘धार्मिक सहिष्णुता’.. परंपरा ..कायम ठेवत आहेत ….भिन्न धार्मिक विचारधारा ‘अफवेच्या चक्रात सापडली… हे वातावरण आता अधिक ‘गढूळ’ होईल काय अशी भीती व्यक्त होत आहे ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच तारखेला दिवे मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले ..त्याला सर्वधर्मियांची यांची साथ मिळाली ..जुन्या लोहयात ‘बडी सवारी’ म्हणजे नाले हैदर होय …सर्व जाती-धर्माचे लोक ‘मोहरम’ निमित्य पूजा अर्चा करतात.. नवस करतात त्या दर्ग्याची चौथी पिढी पत्रकार इमाम लदाफ यांची आहे.. रविवारी दर्ग्यात त्यांनी आपल्या लहानग्या मुलीसह दिवा लावून देश निरोगी व्हावा यासाठी ‘दुवा’ मागितली ..धार्मिक कट्टरतावाद्यांना हा दिवा सोशल मिडियातूनही पोळला ( चुटका) असावा(?)
लोह्याला धार्मिक एकोप्याची परंपरा आहे ..गावात सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात .. शहरात इमाम लदाफ यांनी दर्ग्यात लावलेला’ दिवा’ धार्मिक सहिष्णुता -मानवता ‘प्रकाशमान ‘करणारा होता .. महामारीच्या ‘अंधारात’ सापडलेल्या माणसांना कोरोना हा मानवजातीचा’ शत्रू आहे. हे उमजले …
सध्याच्या काळात दोन समूहात संशयाचे वातावरण सुप्तावस्थेत पहायला मिळते ..जेथे हजारो बांधव ‘ दिवे ‘लावून द्वेषाच्या अंधाराला ‘मानवतेच्या’ उजेडाने प्रकाशमान केले तेथे …इमाम लदाफ यांनी लावलेला दिवा हा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक होय ..