अगोदर पोलीस ठाण्यासमोर जमाव,आता भरतीसाठी इच्छुकांच्या रांगा कोरोनाला आयते आमंत्रण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड  : वैजनाथ  स्वामी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयात हंगामी कर्माचाऱ्याच्या भरतीसाठी जाहिरात दिल्यानंतर आज सकाळी त्याठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी झाली.एकीकडे गर्दी टाळण्याचे आव्हान केले जात असताना दुसरीकडे प्रशासनच गर्दी होईल अशी परिस्थिती निर्माण करत आहे.

मुळात भरतीची जाहिरात दिल्यानंतर इच्छुकांच्या रांगा लागतील हे ठरलेलेच होते.अशा वेळी प्रशासनाने अगोदरच गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची गरज होती.सध्या राज्यात त्याचबरोबर मराठवाड्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.हे पाहता आपण आणखी सावध होण्याची गरज असताना कुठे पोलीस स्टेशनसमोर जमाव जमा होत आहे तर भरतीसाठी शेकडोच्या संख्येने जमा होत आहे.एकप्रकारे आपण कोरोनाला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहोत असेच या गर्दीसत्रामुळे दिसत आहे.