कोरोना विषाणूच्या संकटकाळी दिव्यांग ,वृध्द ,निराधार यांच्यासाठी जाहिर केलेल्या योजनाची प्रशासनाने त्वरित अंमलबजावणी करावी – चंपतराव डाकोरे कुंचेलिकर

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड :- दिव्यांग वृध्द, निराधार व्यक्तीला शासनाने संचार बंदीच्या काळात भयंकर माहामारी कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी दिव्यांगांला अपंग कल्याण आयुक्तालय पुणेच्या आदेशा मार्फत दिव्यांग व्यक्तीला दररोज लागणारी सर्व जिवनावश्यक वस्तुंची किट,म्हणजेच अन्न धान्य, कडधान्य, डाळी, तेल, तांदुळ, साखर, सनिटायझर, साबण, मास्क, रुमाल, डेटौल, फिनेल आणि 2 वेळेचे जेवणाचा डब्बा/नास्टा इत्यादी साधारणपणे संचार बंदीत पुरेल एवढे सामान दिव्यांग व्यक्तीला तात्काळ घरपोच द्यावे. व तसेच दिव्यांग व्यक्तीला दरमहा मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अतिरिक्त एक हजार असे दरमहा दोन हजार त्वरित मानधन, उज्जवला योजनेत दरमहा गृह तिन गृस विनामुल्य व तिन महिन्यासाठी जनधन योजनेत दरमहा 500 रू बँक खात्यात द्यावी अशी सुस्पष्ट सुचना मा.अपंग कल्याण आयुक्त, पुणे यांनी दिनांक 26/03/2020 रोजीच्या पञाव्दारे सर्व विभागीय आयुक्त व तसेच सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

पण प्रशासनाने या आदेशाची व ग्रामपंचायत,नगरपधचायत, नगरपालिका,महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद तर्फे मिळणारा दिव्यांग बांधवांचा हक्काचा राखीव असलेला 5 टक्के निधी मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी नांदेड जिल्ह्यातील मा समाजकल्याण अधिकारी.सर्व गटविकास अधिकारी.सर्व तहसिलदार साहेब. यांच्या व्हाटसअप्प वर निवेदण देऊन फोनवर काँल वर चर्चा करुन संचार बंदीतही दिव्याग वृध्द निराधार यांच्या साठी सतत दिवस राञ झटून सुध्दा शासन व लोकप्रतिनिधीने दिव्यांगांकडे पाठ फिरवली आहे. व तसेच या अतिप्रसंगाच्या काळात शासन निर्णय व शासन आदेश असुन सुद्धा शासनाकडुन दिव्यांगांला कोणतीही मदत व सुविधा मिळत नसल्याने दिव्यांग व्यक्तीवर उपासमारीची वेळ आली आहे.

तरी प्रशासनाने शासनाने त्वरीत दिव्यांग उपासमारी त्या व्यक्तीला येऊ नयेतात्काळ कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी निवेदनात दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ शेरकुरवार, विठ्ठल बेलकर, राहूल मोगरेवार, सुदर्शन सोनकांबळे, चांदु गवाले ईत्यादी कार्यकर्त्यांनी केले.