पालकमंत्री चव्हाणांकडून मुदखेड तालुक्यातील शेतमजूर,कष्टकरी,गोरगरिब कुटुंबांना अजूनही मदतीचा अपेक्षा….

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

मुदखेड : रुखमाजी शिंदे 

भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडून मुदखेड तालुक्यातील शेतमजूर,कष्टकरी,गोरगरिब कुटुंबीयांना अजूनही मदतीची अपेक्षा असल्याचे दिसून आलेले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॅाकडाऊन अन संचारबंदी केलेली असताना भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागाकडे पाठ फिरवल्यामुळे अनेक मजूर,कामगार,गोरगरिब कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली असून अशा संकट प्रसंगी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून वैयक्तिक मदत करावी अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत भोकर,अर्धापूर,मुदखेड अशा एकूण तीन तालुक्यांचा समावेश आहे.यामध्ये पालकमंत्री चव्हाण यांनी भोकर आणि अर्धापूर या दोन तालुक्यात अन्नधान्य इतर मदत वाटप केल्याचा मोठा गाजावाजा इतर तालुक्यात पसरला गेला,अनेकांना ही माहिती समजली.
यानंतर मुदखेड तालुक्यातील शेतमजुर,कामगार,कष्टकरी,गोरगरीब यांनाही आपल्या आमदारांकडून आपल्याही मदत मिळणार अशी अपेक्षा अनेकांना लागली होती,

परंतु अचानक पालकमंत्री चव्हाण साहेबांनी मुदखेडकडे पाठ फिरवल्यामुळे गोरगरिब नागरिकांची नाराजी व्यक्त केली आहे,परंतु अनेक खेड्यापाड्यातील शेतमजूर कष्टकरी,कामगार,अल्पभुधारक शेतकरी, गोरगरिबांना चव्हाण साहेब थेट घरी येऊन निश्चित मदत करतील अशी अपेक्षा बहुसंख्य शेतमजूर,गोरगरिबांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात एकूण पन्नास गावांशेजारी जवळपास आठ ते दहा तांडा वस्ती आहेत,येथे अनेक गोरगरीब,कष्टकरी,मजुर, कुंटुबीय वास्तव्यास आहेत,यामुळे आता पालकमंत्री चव्हाण हे तालुक्याला कधी मदत पुरवठा करणार,याची अपेक्षा ज्यांचे हातावरील पोट आहे अशा अनेक गोरगरिब कुटुंबीयांना लागली आहे.