मुखेडात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  : ज्ञानेश्वर डोईजड
          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसविरोधात एकजूट दाखवण्यासाठी देशाला ९ वाजता ९ मिनिटं दिवे, मेणबत्ती आणि टॉर्च लावण्याचं आवाहन केले  होते  याला   मुखेड मध्ये  प्रचंड  प्रतिसाद  मिळाला .
      प्रत्येकांनी आपल्या  घरासमोर दिवे  लावून मोदीजींच्या कोरोना विरुद्ध च्या लढाईत सर्व  भारतीय  एक  आहोत जणू  असा  संदेश  दिला  आहे .
          गेल्या महिन्यात २२ मार्चलाही पंतप्रधान मोदींनी देशाला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्याला जनतेनं प्रचंड प्रतिसाद दिला होता. यामुळे जनता कर्फ्यू यशस्वी झाला. आता मोदींनी केलेलं दिवा लावण्याच्या आवाहनाला जनता उत्तम प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सचेही  पालन  केले  आहे .