लंगर सेवा अविरत सुरुच ; हजारों नागरिकांना दिलासा !

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी स्वामी

गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डाने लॉक डाउनच्या काळात देखील उपाशी, गरजूं नागरिकासाठी अविरत पणे लंगर सेवा सुरुच ठेवली आहे. शनिवार दि. 4 एप्रिल रोजी सकाळ पासूनच गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने शहराच्या चिखलवाडी, यात्री निवास रोड, टीसीआय गल्ली, भगत सिंघ मार्ग, अबचल नगर भागात वाहनात आणून लंगरचे वितरण करण्यात आले. शनिवारी दहा ते पंधरा हजार लोकांना लंगर वाटण्यात आले आहे.

गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. गुरविंदर सिंघ वाधवा यांच्या व्यवस्थापनात गुरुद्वारा लंगर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी लंगर तयार करून विविध भागात नागरिकापर्यंत ते पोहचवले. या वेळी गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंदर सिंघ बुंगाई, सदस्य गुरुचरणसिंघ घड़ीसाज़, गुरमीत सिंघ महाजन, सरदूल सिंघ फ़ौजी, मनप्रीत सिंघ कुंजीवाले, जगबीर सिंघ शाहू, भागिन्दर सिंघ घड़ीसाज, देवेंद्र सिंघ मोटरावाले, गुलाब सिंघ कंधारवाले, नौनिहाल सिंघ जहांगीरदार, अवतार सिंघ पहरेदार, रणजीतसिंघ चिरागिया, डी. पी. सिंघ, ठानसिंघ बुंगाई, हरजीत सिंघ कडेवाले, नारायण सिंघ नंबरदार, रविंदर सिंघ कपूर, हरविंदर सिंघ मदतगार सह अधिकारी आणि कर्मचारी आणि सेवाभावी नागरिक यांचे सहकार्य लाभले. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदर सिंघ मिनहास आणि उपाध्यक्ष स. गुरविंदर सिंघ बावा हे वेळोवेळी अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा यांच्याशी संपर्क साधून माहिती घेताहेत.