शॉट सर्कीटने लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य जळुन खाक ; बालंबाल वाचला तिघांचा जीव

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड शहरातील साईबाबा मेडीकल समोरील घरात लागलेल्या आगीत संसारउपयोगी साहित्य जळुन खाक झाल्याची घटना दि. 04 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.

शहरातील संजय पुठेवाड वय 35 हे शेतात सालगडी म्हणुन काम करीत असतात. ते शेतात कामाला गेले असता त्यांची पत्नी आपल्या दोन मुलासोबत घरीच होत्या. अचानक शॉट सर्कीटने आग लागली . पाहता – पाहता आगाीने रौद्र रुप धारण केले. आग पाहताच  शेजारील राजु गरुडकर , कैलास एकाळे यांनी आपला बोरचे पाण्याने  व शेजारील व्यक्तीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

घरात दोन मुलांसह तिघे होते हे पाहताच शेजारीत अनिल आडबलवार उंद्रीकर, विजय दारशेवाड, निळकंठ बिजलवाड यांनी घरावरील पत्रे काढुन घरात आत प्रवेश करुन तिघांना सुखरुप बाहेर काढल्याने तिघांचा जीव  बालंबाल बचावला.

तर मुखेड नपाची अग्निशमकाची गाडी येऊन पुर्ण आग विझवली. घरातील संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाल्याने पुठ्ठेवाड कुटूंब उघडल्यावर आले असुन शासनाकडुन या गरीब कुटूंबाची मदत व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली.


सदर बातमी कळताच स्थानिक नगरसेवक चंद्रकांत गरुडकर, प्रा.विनोद आडेपवार यांनी  तात्काळ धाव घेतली. यावेळी  आजुबाजुंच्या नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.