तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या हस्ते गरजुंना धान्य वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाल्याने अनेकांचे हातवर पोट आज काम केले तरच उदया पोटात अन्न अशी अवस्था अशा गोर गरीबांना के.एच. हसनाळकर यांच्या वतीने मुखेडचे तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या हस्ते धान्य वाटप करण्याज आले.

मुखेड तालुका अतिशय डोेंगराळ भाग,कोणताही मोठा कारखाना नाही, मजुरांची संख्या त्याही जास्त येथील अनेक मजुर परराज्यासह मोठया शहरात कामाला जातात. आता लॉकडाऊनमुळे काम बंद, रोजगार नाही अन घरात पैसाही नाही. तालुक्यात अनेक दानशुरांनी अशा कामगारांना आप आपल्या पध्दतीने मदत करीत आहेत. त्यातच सामाजिक कार्यकर्ते के.एस. हसनाळकर यांनीही गोर गरीब वंचिताना मदत तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या हस्ते वाटप करुन केली.