सोशल मिडीयातील आवाहनाला प्रतिसाद देत मदतीचा ओघ दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढे 131 कुटूंबास धान्य वाटप

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

शहरात अपक्ष नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या वतीने अन्नधान्य वाटप केले पण नागरीकांची मागणी वाढत असल्याने प्रा.आडेपवार यांनी सोशल मिडीयात आवाहन केले त्यास प्रतिसाद देत अनेकांनी मदत केली त्यामुळे 131 कुटूंबापर्यंत दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य वाटप केले.

यात शहरातील डॉ. पांडुरंग श्रीरामे यांच्याकडुन सहा  किट,विश्वकर्मा फर्निचर यांच्याकडून 25 कि.गॅम तांदुळ, गजानन पांपटवार यांच्याकडुन 20 कि.ग्रॅ दाळ,राजे छत्रपती अॅकडमीचे संचालक कॅप्टन ज्ञानेश्वर डुमणे पाळेकर यांच्याकडुन 50 कि.ग्रॅ, गहु व 50 कि.ग्रॅम तांदुळ तर नांदेड जिल्हा मध्यवर्ती  बँक कर्मचारी यांच्याकडुन चार हजार रुपयाचे धान्य तर शंकर पाटील उमाटे यांच्याकडुन प्रत्येक किट मध्ये टरबुज देण्यात आले.

यापुर्वीही अनेकांनी मदत केली असुन मुखेडकरांचा मदतीचा ओघ सुरुच असुन लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या  गोर गरीब गरजुंना धान्य मिळत आहे. अनेकांच्या घरातील बंदचुल पेटल्याने प्रा. विनोद आडेपवार यांच्या मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत असुन या वाटपासाठी तहसिलदार, पोलिस निरीक्षक,मुख्याधिकारी यांनी सुध्दा उपस्थिती लावली होती.