कोरोना हरला पाहिजे शिक्षण नाही…

देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर : विशाल पवार

देगलूर शहरातील मधील जे अँड बी करिअर पॉईंट चा अभिनव उपक्रम.सध्या देशासह संपूर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून सर्वोत्कृष्ट शिक्षणाच्या बळावरच आपण अशा संकटाना मात देऊ शकू… या उद्देशाने जे अँड बी करिअर पॉईंट क्लासेस तर्फे विद्यार्थांसाठी अभिनव उपक्रम राबविला जात आहे. सुट्यांमध्ये विद्यार्थी शिक्षणा पासून दूर जाऊ नये व त्याची गुणवत्ता कमी होऊ नये यासाठी क्लासेसच्या अनुभवी शिक्षकांनी अपार मेहनत घेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी खास होम वर्क शीट तयार करून विद्यार्थांना दिल्या. त्याच बरोबर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थांना शिक्षण घेतले पाहिजे या साठी क्लासेस तर्फे अँड्रॉइड ऍप्लिकेशन सुद्धा तयार करण्यात आले आहे.

या ऍप्लिकेशन द्वारे विद्यार्थांना ऑनलाईन व्हिडिओ, ऑनलाईन टेस्ट, नोट्स, सर्व काही मिळणार आहे.या अँड्रॉइड ऍप्लिकेशन चा सर्व देगलुर शहरातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी उपयोग करून घ्यावा ही सूचना क्लासेस चे संचालक अक्षय जाधव यांनी दिली आहे. ऍप्लिकेशन चा उपयोग करण्यासाठी 7276532453 नंबर वर विद्यार्थ्यांचं नाव, ईयत्ता, आणि शाळेचं नाव एसएमएस करायचे आहे. शासनाच्या वर्क फ्रॉम होम या आदेशाची अंमलबजावणी करताना विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती थांबणार नाही याची काळजी जे अँड बी करिअर पॉईंट क्लासेस तर्फे घेतली जात असल्यामुळे या उपक्रमाबद्दल पालकामधून समाधान वेक्त केले जात आहे.