शिवसेनेच्या वतीने मुक्रमाबाद येथे सोशल डिस्टींगचे पालन करीत रक्तदान शिबीर

नांदेड जिल्हा मुखेड

मुक्रमाबाद : प्रतिनिधी

कोरोणा व्हायरसचा वाढता प्रादुर्भावला रोखण्यासाठी आज देशातील जवान व पोलीस यंत्रणा रांत्र दिवस आपली सेवा बजावीत असताना यांच्या सुरक्षेतेसाठी आज शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने मुक्रमाबाद येथे सोशल डिस्टींगचे पालन करीत रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी ६० रक्तदात्यानी रक्तदान केले.

आज देशात कोरोणा व्हायरस नुसता थैमान घातल्याने नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहे.या विषारी व्हायरसला रोखण्यासाठी यावर खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान यांनी देशाला २१ दिवसाठी लाँकडाऊन केल्यामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.आज लाँकडाऊनचा १० वा दिवस असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी आज आपले भारतीय जवान सीमेवर कडक पाहारा देत आहे.याबरोबर देशातील पोलीस यंत्रणा व वैद्यकीय अधिकारी सुध्दा चौख सेवा बजावीत आहेत.

अशा संकट कालीन परिस्थितीत सुरक्षितता म्हणून शिवसेनाही कधीच मागे राहत नाही.८०% टक्के समाजकारण व २०% टक्के राजकारण या युक्ती प्रमाणे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बालाजी पसरगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यबस्थानक मुक्रमाबादवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.संचार बंदी लागू असतानाही ६० रक्तदात्यानी रक्तदान केले.


यावेळी रक्तदान शिबीराचे उदघाटन डॉ.जगदीश गायकवाड यांनी केले.तर सपोनि कमलाकर गड्डीमे, शिवशंकर पाटील,राहुल बलशेटृवार,मराठी पत्रकार संघाचे गंगाधर चामलवाड,विनोद आपटे,संतोष हेसे,दादाराव गुमडे यांची प्रमुख उपस्थिती होती.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे मनोज जाधव,अतुल सुनेवाड,शिओम पाटील,राहुल इंदुरे ,विजु पाटील,राज गुमडेसह जिवन ब्लड बाँक नांदेड यांनी परिश्रम घेतले.