कोरोनाचे कारण समोर करत बड्या व्यापार्‍यांनी वाढवले किराणा मालाचे भाव

नांदेड जिल्हा हदगाव

 

हदगाव देवानंद हूंडेकर

देशभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असुन हदगाव तालुक्यातील जिवनावश्यक आसलेला किराणा माल वाढत्या किंमतीने लावुन ग्राहाकाची लुट हदगाव शहरात होतांना दिसुन येत आहे.

आत्तापर्यंत कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार समोर आले आहे.तर प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री महोदयाने कोरोनावर प्रतिबंधात्मक आनेक प्रक्रीया चालु केले आहेत.परंतु हदगाव तालुक्यातील बड्या किराणा व्यापार्‍यांनी ग्रामीण भागातील छोटे—छोटे किराणा दुकानदार व ग्राहकांना जिवनावश्यक वस्तुची खरेदी करतांना त्यांच्याकडुन मात्र जास्त दराने पैस घेत आसल्याचे हदगाव शहरात नागरिकांच्या तोंडुन बोलल्या जात आहे.या परिस्थितीत नागरिकांनी जगायचे कसे हा प्रश्न लाखो भारतीयांना सतावत आहे.

लाॅकडाउनचा निर्णय सरकारने चांगला घेतला पण हातावर पोट असणार्‍या लोकांच्या घरातील चूल पेटने अवघड झाले.हाताला काम नसल्यामूळे आर्थिक आवक बंद झाली.त्यातल्या त्यात हदगावचे बडे किराणा व्यापारी कोरोना बिमारीचा फायदा घेऊन ग्राहकाकडुन मोठ्या प्रमाणात एकंदरीत लुट करण्यात येत आसतांना जोरदार चर्चा शहरात रंगत आहे.या विषयावर हदगावचे उपविभागीय अधिकारी,तसेच तहसिलदार याकडे लक्ष घालतील का ? आसा ही प्रश्न मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोरोनामुळे सर्व व्यापार ठप्प आहेत.परंतू अवश्यक वस्तुला सुट देण्यात आली.यामध्ये दवाखाने,किराणा,भाजी,फळ विक्री,मेडिकलचा समावेश आहे.छोट्या दुकान दारांना किराणा माल ठोक भावात विक्री करणारे बडे व्यापारी कोरोनाचा फायदा घेत दाम दुप्पट दरात माल विक्री करत आहेत.त्यामूळे छोट्या दुकानदारांना गोरगरीब जनतेला चढत्या भावाने माल विकावा लागत आहे.यामध्ये सामान्य जनतेचे मरण आले आहे.सर्व कामे बंद असल्याने हाताला काम नाही.तर पैसा येणार कुठून हा जीवघेणा प्रश्न जनतेसमोर आहे. अाजरोजी अनेक संस्थाने,कलाकार, अधिकारी,कर्मचारी,तसेच व्यापारी किराणा वगळता आनेक भारतीय लोकांनी कोरोना ग्रस्तासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस फंड देत आहेत.हदगाव,हिमायतनगर,तामसा,निवघा बाजार या बड्या किराणा व्यापार्‍यांकडून मदत होत नसली तरी कमीत कमी ज्या भावात विक्री होणारा माल त्याच भावात विकला तरी पुण्य घडेल आसे ही जनता बोलत आहे.

डोळ्यांवर पैस्याची पट्टी लावून सामान्य जनतेचे रक्त पिणार्‍या किराणा व्यापारी व किराणा माल विक्रेत्यावर फौजदारी कारवाई व्हावी.अशी मागणी सामान्य जनता करीत आहे.हदगाव जबाबदार उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,मुख्याधिकारी यांनी पथक नेमून किराणा मालाची चौकशी कराण्यात येऊन सामान्य नागरिकारा लाॅकडाऊनच्या काळात जिवनावश्यक किराणा,भाजी पाला आहे त्या किमतीत मिळण्यात याव आसे ही नागरिकात चर्चा होत आहे.



महाराष्ट्र कोरोना रुग्णाची संख्या जास्त आसुन याची खबरदारी घेण्यासाठी शासनाने जबाबदार अधिकार्‍यांना कारवाईच्या सुचना दिल्या आसुन हदगाव तालुक्यात बड्या किराणा व्यापार्‍याकडुन एकाद्या वस्तुची किमती पेक्षा जास्त किमतीत होत आसल्याची माहीती हदगावचे उपविभागीय अधिकारी यांना फोनवर देताना सांगितली आसल्याने त्या किराणा व्यापार्‍याकडुन ग्राहकाची लुट होत असतांना माहीती दिली.तसेच ग्रामीण भागातील छोटे-छोट दुकानदार भाव वाढीमुळे त्रस्त झाले आहेत.जनतेच्या खिशावर डल्ला पडत आसल्याची माहीती ही उपविभागीय अधिकार्‍यांना दिली आसतांना त्यांनी उत्तर देतांना म्हणाले की,माझे काम व्यापार्‍यांना सुचना देण्याचे नाही.तर ग्राहकांनी आॅनलाईन तक्रार करावे आसे जबाबदार अधिकारी जर बोलत आसतील तर सामान्य माणसाचे काय होणार ? ही चिंतेची बाब समोर येत आहे.उपविभागीय अधिकारी यांना सामान्य माणसाचे घेणे देणे नसुन बड्या व्यापाल्या सोबत चांगलेच संबंध आसल्याचे त्यांच्या बोलण्यातुन दिसुन आले आहे.