राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुखेडच्या वतीने पोळी डब्बे वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : संदीप  पिल्लेवाड

आपत्ती निवारण सेवा समिती मुखेड जागतिक महामारी बनलेला कोरोना व्हायरस या आपत्तीमुळे संपूर्ण जगावर संकट ओढवलेले आहे. त्याधर्तीवर मुखेड येथील ज्यांच्या हातावर पोट आहे असणाऱ्या तसेच  दिवस रात्र जणतेची सेवा करणारे पोलीस बांधव , रुग्णालयातील रुग्णांची सेवा करणारे कर्मचारी यांना अशांना  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुखेडच्या  आपत्ती निवारण सेवा समिती मुखेड वतीने पोळी डब्बे वाटप करण्यात  आले .

एकुण 77 डब्बे बनवण्यात आले होते  त्यात एकुण 19 घरुन प्रत्येकी 10 पोळ्या संकलन करण्यात आले. या  कामास  चंद्रशेखर पाटील , बालाजी तलवारे , उत्तम अमृतवार यांच्यासह  अनेक  स्वयं  सेवक  काम केले .