भोसीकर कुटूंबियांच्या वतीने गरजुनां धान्यांचे वाटप

कंधार नांदेड जिल्हा

कंधार :  

संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने कलम 144 लागु करण्यात आली आणी संचारबंदी कायदा लागु झाला असल्यामुळे मौल मजुरी करून पोट भरणाऱ्या गोर-गरीब कष्टकरी लोकांचे हाल होत असल्याचे पाहून मजुरी करणाऱ्या लोकांना व गरजुंना भोसीकर कुटुंबियांच्या वतीने तांदुळ व डाळींचे वाटप करण्यात आले.
सद्या थैमान घातलेल्या कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वच ठिकाणी लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे अनेक मजदूर,कष्टकरी,गोर-गरीब व पोटाची खळगी भरणाऱ्या सामान्य जनतेची बेहाल होत असल्याचे पाहुन आपण समाजाचे काही देणं लागतो हा उद्देश मनी बाळगुन सर्व सामान्यांच्या अडचणीत धाऊन जाऊन त्यांच्या अडी-अडचणी लक्षात घेऊन तात्काळ सदैव मदत करणारे भोसीकर कुटुंबीयांच्या वतीने गरजुनां कंधार शहरात अनेक ठिकाणी तांदुळ व डाळींचे वाटप करण्यात आले आहे.यामुळे सामान्य जनतेत भोसीकर कुटुंबीयांच्या बद्दल आत्मीयता वाढली असल्याचे दिसून येत आहे.याअगोदर भोसीकर कुटुंबियांच्या वतीने कुपोषित बालकांना दत्तक घेऊन कुपोषणमुक्त केले त्याच बरोबर,वीज पडून मृत्यु झालेल्या कटुंबातील लोकांना आर्थिक मदत,आत्महत्या ग्रस्थ कुटुंबियांना आर्थिक मदत,अपंगांना साहित्याचे वाटप,गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी जीवन आवश्यक लागणाऱ्या वस्तु चे वाटप,गारपीट झालेल्या शेतकऱ्यांना मदत,व डिजिटल शाळा  करण्यात आलेल्या शाळेतील विध्यार्थ्यांनसाठी एलइडी,शालेय साहित्याचे विध्यार्थ्यांना वाटप अशे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी मोफत मास्क चे वाटप देखील भोसीकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आल्याने सर्व सामन्यांन बरोबर अधिकारी कर्मचारी यांनी देखील भोसीकर कुटुंबियांन बद्दल आत्मीयता बाळगल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.