गुरुद्वारा बोर्डा तर्फे भव्य घरपोच लंगर सेवा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड : वैजनाथ  स्वामी 

कोरोना वायरस विरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्थेने पुढाकार घेतले असून मागील चार दिवसापासून शहरातील नागरिकांना घरपोच लंगर (अन्न दान ) करण्यात येत आहे. रोज हजारों लोकांना या अन्न दानाचा लाभ मिळत आहे.

नांदेड शहरात सध्या कलम 144 सुरु आहे. लॉक डाउन परिस्थितीत शहर बंद मध्ये नागरिकांना खाण्या पिण्याच्या वस्तूंसाठी लोकांची चांगलीच पंचायत होत आहे. अशा वेळी गुरुद्वारा बोर्डाने नेहमी प्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध लंगर तयार करून वाटप सुरु केले आहे. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदर सिंघ मिनहास, उपाध्याय स. गुरविंदर सिंघ बावा यांच्या मार्गदर्शनात सचिव रविंदर सिंघ बुंगाई, व्यवस्थापन समिती सदस्य देवेंद्र सिंघ मोटरावाले, अवतार सिंघ पहरेदार, अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी स. डी. पी. सिंघ चावला, कनिष्ठ अधीक्षक रविंद्र सिंघ कपूर आणि इतर अधिकारी तसेच कर्मचारी लंगर सेवेसाठी परिश्रम घेत आहेत. लंगर तयार करण्यासाठी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला असून पहाटे चार वाजता पासून जेवण तयार करण्याचे कार्य सुरु होत असून रात्र उशिरा पर्यंत लंगर प्रयत्न सुरु आहे.

सैनिटाइजर वितरण :
गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सध्या शीख समाजात सैनिटाइज़र साहित्याचे वितरण सुरु आहे. बोर्डाचे कर्मचारी घरोघरी सैनिटाइज़र च्या बाटल्या वाटण्यात येत आहेत याचे नागरिकांनी ही समाधान व्यक्त केले आहे.

फवारणी :
गुरुद्वारा बोर्डातर्फे अबचलनगर कॉलोनी, यात्री निवास रोड, बड़पुरा, शहीदपुरा, भगतसिंघ मार्ग येथे सैनिटाइज़र आणि औषधिची फवारणी करण्यात येत आहे.