नांदेड जिल्ह्यातील उज्वला योजनेच्या २ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

 

नांदेड : वैजनाथ स्वामी

कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना मोफत गॅस पुरवठा करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार नांदेड जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थ्यांना आजपासून मोफत गॅसचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर नितीन आम्ले यांनी दिली आहे.

देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारा गॅस मोफत मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला गॅस च्या लाभार्थ्यांना तीन महिने मोफत गॅस पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या उपक्रमाला आज पासून नांदेड जिल्ह्यात सुरुवात होत आहे .

जिल्ह्यातील तब्बल दोन लाख लाभार्थ्यांना मोफत गॅस पुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती भारत पेट्रोलियम चे सेल्स मॅनेजर नितीन आम्ले यांनी दिली.
भारत पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांचा पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यात येत आहे. शिवाय शहरी आणि ग्रामीण भागातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या योजनेअंतर्गत मोफत गॅस वाटप करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत लॉकडाऊन च्या काळात आपापल्या घरातच बसून राहावे असे आवाहनही भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर आम्ले यांनी केले आहे.