मुदखेड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी.।

नांदेड जिल्हा मुदखेड

मुदखेड : रुखमाजी शिंदे

मुदखेड नगरपरिषदेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत पालिकेच्या क्षेत्रातील चाैका-चाैकातआवश्यक त्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम पालिका प्रशासनाच्या वतीने हाती घेण्याचे निर्देश मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दि.३० सोमवार रोजी सकाळी ११ वाजता संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

मुदखेड नगरपरिषदेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत पालिका क्षेत्रात चाैक-चाैकात आवश्यक त्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम पालिका प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या आदेशाननुसार सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार करुन पालिकेच्या वाहनामध्ये भरून ते सर्वत्र फवारले जात आहे.शहराच्या चाैका- चाैकांमध्ये आज रात्री ८:३० च्या सुमारास फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक,रेल्वे गेट परिसर,नगरपरिषद,ग्रामीण रूग्णालय,एस बी आय बॅक परिसर या परिसरातून फवारणीला सुरुवात करण्यात आली तर शहरात टप्याटप्याने सर्व परिसरात या निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी येणार करण्यात आल्याची माहिती पालिकेचे बिल कलेक्टर दिलीप पवार यांनी दिली.

विशेष करुन ज्या भागात नागरिकांची वर्दळ,बाजारपेठ,अस्वच्छता दुर्गंधी,सांडपाणी,खाजगी वाहनस्थळे असतात अशा परिसरात सर्व भागात फवारणी करण्याचे निर्देश न.प.मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी यांना दिले होते. त्यानुसार तातडीने फवारणीला सुरुवात करण्यात आल्याचे माहीती पालिकेचे बिल कलेक्टर दिलीप पवार यांनी दिली आहे.