मुदखेड तालुक्यात वाळू माफीयांचा पुन्हा सुळसुळाट,,कोरोना विषाणूचे गांभीर्य नाही…प्रशासनाने एक बोट केली उदध्वस्त..!!

नांदेड जिल्हा मुदखेड

 मुदखेड : रुखमाजी शिंदे

मुदखेड तालुक्यात वाळू माफीयाकडून वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वाहतूक चालू असून,अनेक चोरीच्या,छुप्या मार्गाने वाहतूक केली जात आहे,या महिन्यात पुन्हा महसूल प्रशासनाने वाळूचा उपसा करणारी बोट उध्दवस्त करत ही दुसरी कार्यवाही केली,तरीही वाळू चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहीला नसल्याचे दिसत असून माफीयांना कोरोना विषाणू संसर्ग सुध्दा ही गांभीर्य राहिलेले नाही.

कोरोगा विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी चालू आहे,परंतु दुसरीकडे वाळू माफीया सर्रासपणे वाळू उत्खलन आणि चोरीच्या मार्गाने वाहतूक करत आहेत. दि.३० मार्च सोमवार रोजी सकाळी महसूल प्रशासनाने तालुक्यातील मौजे महाटी येथील गोदावरी नदीच्या ब़ॅकवाटर नाल्यात वाळू काढण्याच्या उद्देशाने लपवून ठेवण्यात आलेली वाळू उपाशी करणारी एक बोट जिलेटीन साह्याने उदध्वस्त करण्यात आली.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्र संचार बंदी असताना सुध्दा माळकाैठा,महाटी,आमदुरा,वासरी,ब्राह्मणवाडा भागातून मोठ्या प्रमाणात वाळुची चोरी होत आहे

तालुक्यातून एकाही वाळु घाटाचा लिलाव झालेला नसताना बिनधास्त वाळू उत्खनन व चोरीच्या मार्गाने वाहतूक सुरु आहे.दुसऱ्या बाजूला तालुका प्रशासन कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात जनजागृती आणि उपाय योजना राबविण्यात व्यस्त आहे,या संधीचा फायदा घेऊन वाळुमाफिया सक्रिय झाले असून रात्रीच्या वेळेला बहुतांश घाटावरून वाळू उत्खनन केले जात आहे. या विरोधात महसूल प्रशासनाने पथके स्थापन करून कारवाई केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.परंतु महसूल प्रशासनाने मोठी दंडात्मक कार्यवाही केल्याशिवाय वाळू माफीयांवर वचक बसणार नाही असे संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

सदरील कार्यवाही ही भोकर उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसीलदार संजय नागमवाड,मंडळ अधिकारी हयुम पठाण,तलाठी संजय खेडकर,प्रविण होंडे व मारोती मगरे,ड्रायव्हर सय्यद खाजा यांच्या पथकाने केली.