दिल्लीच्या इजतेमासाठी नांदेडचे 13 उपस्थित ; एकास घेतले ताब्यात

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

मुखेड / ज्ञानेश्वर  डोईजड

दिल्लीच्या इजतेमा कार्यक्रमासाठी नांदेड जिल्हयातील 13 जन कार्यक्रम करुन नांदेडला रवाना झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी नाव व मोबाईल क्रमांकसहीत नांदेड पोलिसांना दिलेली आहे. त्यापैकी एकास नांदेड पोलिसांनी हिमायतनगर येथुन ताब्यात घेतले असुन त्यास हिमायतनगरच्या आयसुलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे तर इतर बारा जनांचा शोध सुरु आहे. या माहितीमुळे संपुर्ण नांदेड जिल्हयामध्ये खळबळ उडाली असुन संपुर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

जिल्हयात यंत्रणा चांगली काम करत असल्यामुळे आतापर्यंत नांदेड मध्ये एकही कोरोनाचा रुग्ण पॉझिटीव्ह आढळला नव्हता पण यामुळे अनेक नागरीकांचा जिव भांडयात पडला आहे. अनेक नागरीक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत कारण ते बारा कुठे आहेत कुठे, कुठे भेटले आहेत याचा अजुन थांग पत्ता लागला नसुन कोरोना पॉझिटिव्ह होण्याची भितीने नागरीक घरातच राहणे पसंद करीत आहे.

हिमायतनगरमधील भरती केलेल्या त्या रुग्णाचा   अजुन कोणताही रिपोर्ट आला नसुन मात्र संपुर्ण यंत्रणेत सुध्दा चिंतेचे वातावरण आहे. यामुळे नागरीकांनी सुध्दा बाहेर येणे टाळणे योग्य राहील कारण नांदेडसाठी ही धोक्याचीच घंटा असल्याने नागरीकांनी सहकार्य करावे.