जिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड चा नक्षत्र पवार आर.टी.एस.ई. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : प्रतिनिधी
                  राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर इयत्ता २ री ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी RTSE FOUNDATION  व डॉ.पं.दे.रा.शि.प. द्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या Rationalist Talent Search Examination (RTSE) 2020 च्या निकालाबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये अतिशय उत्सुकता होती. COVID – 2019 च्या संकटामुळे लांबणीवर पडलेला सदरील परीक्षेचा निकाल दि. २७/०३/२०२० रोजी परीक्षेच्या अधिकृत www.rtsexam.com  ह्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षेचे संचालक तथा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल व डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर यांनी दिली.
  दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी राज्यातील २७८ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या सदरील परीक्षेत  जिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड चा नक्षत्र विजय पवार ( इयत्ता तिसरी )  200 पैकी 178 गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम तर खंडेश्वर विठ्ठल नकुलवाड ( इयत्ता 4 थी  )   जिल्ह्यात दुसरा, जीवनदीप जगदीप जोगदंड ( इयत्ता 2 री )   जिल्ह्यात तिसरा, हरिओम रामदास शिंदे ( इयत्ता 6 वी ) जिल्ह्यात तिसरा आला आहे.
          राजमाता जिजाऊ निवासी वस्तीग्रह चा अतिक मैनोदीन सय्यद ( इयत्ता 8 वी ) जिल्ह्यात प्रथम तर रसूल चांदपाशा सातापूरे ( इयत्ता 9 वी ) जिल्ह्यात तिसरा आला आहे.
नक्षत्र पवार व अतिक सय्यद या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम येवून जिल्हास्तरीय स्कॉलरशिप मिळवत शाळेचे नावलौकिक केले असून  इतर ३ विद्यार्थी सदरील परीक्षेच्या जिल्हास्तरीय शिष्यवृतीस पात्र झाले आहेत.
 राज्य व जिल्हा स्तरावर यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, मेडल व शिष्यवृत्ती देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
          विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुखेड भुषण डॉ. दिलीप पुंडे, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक कौरवार, बालरोग तज्ञ डॉ. प्रकाश पांचाळ, गट शिक्षण अधिकारी राम भारती, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड, सचिव जगदीश जोगदंड, मुख्याध्यापक जगदीप जोगदंड, पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी कौतुक केले आहे.