माजीसैनिकांनी जपले सामजिक दायित्व….जवळपास २५० कुटुंबाना धनगर टेकडी भागात केले धान्याचे वाटप

नांदेड जिल्हा मुदखेड
मुदखेड  : रुखमाजी शिंदे 
                कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचार बंदी लागू आहे,त्यामुळे मोलमजुरी करुन आपल्या कुंटुबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे,आपल्या भागातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाची अन्नधान्य वाचून गैरसोय होऊ नये,या करिता शहरातील माजी सैनिक तथा न.प.माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी सामाजिक दायित्व जपत जवळपास २५० कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप केले.
शहरातील धनगर टेकडी,मनुरवार गल्ली,मराठा गल्ली या भागातील गरजू गोरगरीब कुंटुबीयांना नगरसेवक लक्ष्मणराव देवदे यांनी स्वतः च्या खर्चातून अन्यधान्याचा पुरवठा केला.राजमाता पुण्यश्लोक अाहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येथे अत्यंत शिस्तीमध्ये त्यांनी गरजू कुंटुबीयांना अन्नधान्याचे वाटप केले.देवदे यांच्या मदतीने अनेक वृध्द निराधार महिला या भारावून गेल्या असल्याचे दिसून आले,दरम्यान देवदे यांनी सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमांचे शहरवासियातून काैतुक गेल्या जात.
       यापुर्वी देखील सामाजिक जाविवेच्या भूमिकेतून माजी सैनिक लक्ष्मणराव देवदे यांनी अनेकांना मदत केली आहे,या पुढे देखील आवश्यकतेनुसार प्रसंगानुरुप गरजुना आपल्या परीने केल्या जाईल अशी ग्वाहीही या निमित्ताने बोलताना माजी सैनिक लक्ष्मणराव देवदे यांनी दिली.