जयप्रकाश कानगुले यांनी स्वखर्चातुन केली जंतुनाशक फवारणी

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  संदिप पिल्लेवाड

शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील महाकाली गल्ली, कोळी गल्ली,हेडगेवार चौक,धोबी गल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कानगुले यांनी कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणारी जंतुनाशक फवारणी स्वखर्चातुन केली.

सध्या कोरोणा विषाणुने जगात व देशात थैमान घातला असुन सगळीकडे जंतुनाशक फवारणी करणे चालु असतानाच मुखेड नगर परिषदेतर्फे शहरात जंतुनाशक फवारणी करणे चालु आहे. शहर हे मोठे असल्या कारणाने फवारणी लवकर होत नसल्याचे पाहुन प्रभाग क्रं ६ मधील सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कानगुले यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाज कार्यात सदैव अग्रेसर असणारे एक जानकार नागरिक यांनी वार्डात स्वखर्चातुन भाड्याने फवारणी मशिन व जंतुनाशक औषधी विकत घेऊन जंतुनाशक फवारणी केली.

यांच्यासोबत प्रभाग क्रमांक सहा मधील शंकर नाईनवाड, ईमरान आत्तार, दिपक सुत्रावे, शाहरुख सौदागर, गफारभाई शेख, कोतवाले कैलास, कोतवाले अमोल, कोतवाले प्रकाश सुत्रावे संतोष, वाहब सौदागर, छोटुभाई शेख आदींनी जंतुनाशक फवारणी करण्यासाठी मेहनत घेतले. प्रभाग क्रमांंक ६ मधील महाकाली गल्ली, कोळी गल्ली, हेडगेवार चौक, धोबी गल्ली, गाडगेबाबा चौक मधील नागरिकांनी जयप्रकाश कानगुले व सहकार्यांचे आभार मानले.