उमरी: संशयित करोना रुग्ण आढळल्याने शहर कडकडीत बंद ; किराणा, भाजीपाला दुध डेअ-याहि कडकडीत बंद

उमरी ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता उमरी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व पोलिस निरीक्षक अशोकराव अनंत्रे यांनी आज दि ३१ मार्च रोजी शहरातील आज सकाळपासून किराणा दुकान व भाजीपाल्याची दुकाने बंद करण्यात आल्याने शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर एक माणुसही दिसला नाही .फक्त पोलिस व नगर पालिका कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसुन आले .

सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आज उमरी नगर पालिका व पोलिस प्रशासनाने किराणा दुकान व भाजीपाल्याचेही दुकाने बंद करण्यात आली व नागरिकांना घराबाहेर पडु नका असा आदेश देण्यात आला आहे.

सध्या उमरी तालुक्यात कोरोना संशयित रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ झाली असुन प्रशासनही सर्तक झाले आहे. आज उमरी शहरातील किराणा ,दुकान ,भाजीपाल ,दुध व बेकरी ही दुकाने आज बंद ठेवण्यात आली तसेच घराबाहेर पडू नका ,गर्दी करु नका असा सल्ला नगर पालीके च्या वतीने देण्यात आला . बाजार गल्ली व साईबाबा मंदीर परिसारात नगरअध्यक्षा सौ अनुराधा सदानंद खांडरे यांच्या वतीने नागरिकांना भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले .

सध्या उमारी तालुक्यात कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे प्रशासनही नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका असा सल्ला देत आहेत.