सामाजिक दायित्व जोपासत न.पा. प्रशासनास मदत नंदकुमार मडगुलवार यांच्या तर्फे फवारणी यंत्र व ए.पी.जे.समितीकडून फिनाईल वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदिप पिल्लेवाड

शहरात नगरसेवक विनोद आडेपवार मित्र मंडळातर्फे निराधार लोकांना राशन वाटप सुरु असताना शहरातील व्यापारी नंदकुमार मडगुलवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे प्रतिष्ठित व्यापारी तथा काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांच्या वतीने कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून नगर परिषद प्रशासनास फवारणी यंत्र देण्यात आले.

कोरोना विषाणूच्या भितीने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. शहरात अनेक भागात अस्वच्छता वाढली आहे. अनेक नागरिकांनी समाज माध्यमाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी शहरात फवारणी सुरू केली.

पण फवारणी यंत्राचा तुटवडा लक्षात घेता काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांनी न.पा.प्रशासनाचे कर्मचारी बलभीम शेंडगे, कुंवरचंद वाडेकर यांच्याकडे एक फवारणी यंत्र सुपूर्द केले. नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी नंदकुमार मडगुलवार यांचे आभार व्यक्त केले. तसेच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या वतीने मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांना शहराच्या स्वच्छतेसाठी फवारणी करण्यासाठी फिनाईल औषध देण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.