वक्त ग्रूप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने खुडूसच्या आरोग्य विभागास साहीत्य वाटप

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नादेंड : प्रतिनिधी

कोरोना विषाणुमूळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परस्थीती निर्माण झाली आहे.सोलापूर जिल्ह्यतील ग्रामीण भागात परदेश प्रवास करून आलेले नागरीक पुणे -मुंबई व इतर ठीकानाहून कोरोना या विषाणूमुळे स्थलांतरीत नागरीकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात सध्यस्थीतीत आहे.त्यामुळे कोरोना या विषाणूचा प्रार्दुभाव सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पसरण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या प्रसारावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना आवश्यक आहे.कोरोना विषाणुमूळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या पायबंद साठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्यविभाग, ग्रामपंचायती उपाययोजना करीत आहेत.

खुडूस(ता.माळशिरस) आरोग्यविभागाचे कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून कार्य करीत आहेत.खुडूस आरोग्यविभागास अध्याप आरोग्यविभागाकडून कोणतेही त्यांच्या संरक्षणासाठी साहित्य देण्यात आले नाही. आरोग्यविभाग त्यांचे जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्यासाठी आहोरात्र काम करीत आहे.अखेर आरोग्यविभागाच्या मदतीला वक्त ग्रुप महाराष्ट्रराज्य सामाजिक संघटना धाऊन आली.

 

या संघटनेकडून आरोग्य विभागास समीटायझर,हातमोजे,मास्क देण्यात आले.तसेच माळशिरस तालुक्यातील बेघर,अत्यंत हालाकीची परस्थीती असणाऱ्याना जेवन देवून सामाजीक बांदीलकी जोपासली.यावेळी वक्त ग्रूप महाराष्ट्रराज्य संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ जगताप,महाराष्ट्रराज्य उपाध्यक्ष सोमनाथ मुकूंद आदटराव,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष युवराज चव्हाण,सहकारी मित्र दादासाहेब ढेरे यांच्यासह आरोग्यविभाग खुडूसचे डॉ.तुषार तारू,आरोग्यविभागाच्या शिस्टर एच.पी.ओहळ,आरोग्यविभागाच्या आशा वर्कर ,खुडूसच्या राधे शाम गो शाळा संस्थापक अध्यक्ष बंडू कांबळे,पत्रकार सचिन करडे,विनायक साठे,धनाजी साठे,अमोल वाघ,प्रेम कांबळे,प्रकाश लोखंडे अदी उपस्थीत होते.

जनतेच्या अडी अडचनीला व मानूसकीचा जिव्हाळा निर्माण करणारी वक्त ग्रूप महाराष्ट्रराज्य सामाजीक संघटनेचे कार्य कौतुक करण्यासारखे आहे.महामारीसारखी परस्थीती निर्माण झाली असल्याने अनेखानवरती उपासमारीची वेळ आली आहे.ज्यांना एक वेळचे जेवन व आरोग्याच्या सोई सुविधा मिळत नाही अशा लोकांच्या हकेला योग्य वेळी धाऊन जात असल्याने वक्त ग्रूप सामाजीक संघटना या नावाचे सार्थक केले आहे.वक्त ग्रूप सामाजीक संघटनेचा आदर्श घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष,सर्व सामाजीक संघटनांनी जिवना अवशक वस्तूंची मदत करून मानूसकी जपणे गरजेचे आहे.