जि.प.येवती गटात हातावरचे पोट असणाऱ्यास बोनलेवाड यांच्याकडून धान्य वाटप 

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

कोरोनाचा काळ अत्यंत भयंकर त्यात लॉकडाऊन , हाताला काम नाही अगोदरच डोंगराळ तालुका अन स्थलांतराचे  प्रमाण जास्त अशा परिस्थितीत माणूसकीचे दर्शन घडवत संतोष बोनलेवाड जि.प. (प्र.) यांनी येवती गटातील गोर गरीब, वंचित, हातावरचे पोट असणाऱ्यांना  अन्न धान्य वाटप केले.

कोराना विषाणामुळे अनेकांच्या हाताला काम असणारे बंद झाले अनेक गोर गरीबांच्या चुली बंद झाल्या. काय करावे कळेना ? दोन वेळेसचे जेवण बनविण्यासाठी सुध्दा घरातील डब्यात धान्य नाही.


अशा संकटात असताना  येवती जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधी कॉग्रेस नेते संतोष बोनलेवाड मतदारांसाठी धाऊन येत त्यांना गहु,तांदुळ तेल व इतर धान्य वाटप केले. यावेळी संतोष बानेलवाड यांच्यासह मोहन जाधव,कबिरदास कांबळे , आत्माराम कांबळे, तुकाराम धोत्रे उपस्थित होते.